शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ने पाठविले ५०० कामगारांना रजेवर

By admin | Updated: April 4, 2017 00:12 IST

तालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे.

अखेरची घरघर : ऊस उत्पादक व कामगारांत खळबळअविनाश खंदारे उमरखेडतालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व कामगारांत एकच खळबळ उडाली आहे.तालुक्यातील पोफाळी येथे १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेने वसंत साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली. उमरखेड, पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यांत कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. १९७३ साली प्रथम गाळप हंगामापासून २०१५ पर्यंत सतत गाळप होत राहिले. त्यामुळे या परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. परंतु गत काही वर्षांपासून कारखान्याला उतरती कळा लागली. गत २२ महिन्यांपासून कामगारांना वेतन दिले नाही. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. प्रशासन व कामगार संघटनांत अनेक वाद झाले. पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली. दरम्यान, गतवर्षी वसंत कारखान्याची निवडणूक झाली. सर्व नेत्यांनी एकत्र बसून कारखाना सुरू राहिला पाहिजे, यासाठी निवड अविरोध केली. हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील यांची अध्यक्षपदी तर कृष्णा पाटील देवसरकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गतवर्षी क्षमतेएवढे गाळपच झाले नाही. केवळ २३ हजार ५०० टन गाळप होवून कारखान्याचा पट्टा पडला. वसंत कारखान्याची परिस्थिती अतिशय हालाखीची झाली. गत २२ महिन्यांपासून कामगारांचे पगार नाही, पाच कोटी वेतनाचे आणि पाच कोटी ग्रॅज्युटीचे घेणे आहे. सोसायटीचे दीड कोटी, फंडाचे दोन कोटी, व्यापारी पेमेंट दोन कोटी अशी १५ कोटींपेक्षा अधिक देणी आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळांनी वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अर्धपगारी रजेवर जाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रकार वसंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला. या निर्णयामुळे कामगारांत चांगलीच खळबळ उडाली आहे.ऊस उत्पादकांत रोषवसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना रजेवर पाठविले आहे. गत दोन वर्षांपासून गाळप हवे तसे झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय कारखाना कायमचा बंद पाडण्यासाठी तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. उमरखेड तालुक्याची कामधेनू बंद पाडण्याचा घाट घातल्या जात असल्याचा आरोप ऊस उत्पादक करीत आहे.वसंत कारखान्याच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन अधिकारी व कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. बँक संचालक मंडळ व शासनाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.- राजेंद्र खापडकार्यकारी संचालक, वसंत साखर कारखानावसंत कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना ले आॅफ दिला आहे. परंतु या कामगारांच्या कुटुंबांचा व त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, यासाठी कारखाना प्रशासनाने वसंतला भाडेतत्त्वावर द्यावा. त्यातूनच शेतकरी व कामगारांना दिलासा मिळेल.- व्ही.एम. पतंगरावकामगार नेते