शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी ५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:37 IST

जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता ५० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये सहस्त्रकुंड, टिपेश्वर, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणावरील कामांसाठी आतापर्यंत नऊ कोटी रुपये वळते करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहस्रकुंड, टिपेश्वर : प्रशासकीय मंजुरीने चेहरामोहरा बदलणार

यवतमाळ : जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता ५० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटनक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. यामध्ये सहस्त्रकुंड, टिपेश्वर, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणावरील कामांसाठी आतापर्यंत नऊ कोटी रुपये वळते करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्हा विपूल वनसंपदेने नटला आहे. यासोबतच नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले धबधबे, पौराणिक वास्तूशिल्प अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या भागाचा विकास करून पर्यटन समृध्दीसाठी राज्याच्या पर्यटन विभागाने जिल्ह्यासाठी ५० कोटी रुपयांच्या शासकीय कामाला मंजूरी दिली आहे. पर्यटन स्थळाच्या विकासाने या भागाचा सर्वदृष्टीने विकास होण्यास मदत होणार आहे.उमरखेड तालुक्यातील सहस्रकुंड धबधब्याच्या पर्यटन विकासाकरिता चार कोटी ५१ लाख ८२ हजार मंजूर करण्यात आले आहे. यातील ५० लखांचा निधी कामाकरिता वळता करण्यात आला आहे. यातून काही कामेही या भागामध्ये झाली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील वाईल्डलाईफच्या दृष्टीने टिपेश्वर अभयारण्य महत्वाचे आहे. या ठिकाणी वाघासह अनेक वन्यप्राणी पहायला मिळातात. यामुळे या ठिकाणाकडे पर्यटकांचा लोंढा आहे. या भागाच्या विकासाकरिता चार कोटी ७७ लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.यवतमाळ शहरातील संकटमोचन तलावाच्या विकासाकरिता चार कोटी ४९ लाख ३६ हजार रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. कळंब शहरात विकास कामे, दत्तापूर, बेंबळा प्रकल्पाचा पर्यटन विकास, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रातील खटेश्वर सस्थानचा तलाव आणि परिसराचा विकास आणि सौंदर्यीकरण, पाथ्रटदेवी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, आर्णी तालुक्यातील म्हसोला गावातील कान्होबा संस्थान, आर्णी तालुक्यातील पिंपळनेरचे आप्पास्वामी देवस्थान, उमरखेड येथील अंबोना तलाव, आंबाळी येथील दत्तात्रय देवस्थान या ठिकाणच्या विकास कामाकरिता ५० कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामांना मंजूरी मिळाली आहे.