शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:27 IST

पत्नीने केलेली जादूटोण्याची खोटी तक्रार व तिच्याकडून वारंवार होणारी पैशाची मागणी यामुळे तणावात आलेल्या गजानन डाहुले या युवकाने आत्महत्या केली,.........

ठळक मुद्देगजानन डाहुले आत्महत्याप्रकरण : पोलीस कारवाईनंतर मृतदेह विहिरीबाहेर काढला

ऑनलाईन लोकमतमारेगाव : पत्नीने केलेली जादूटोण्याची खोटी तक्रार व तिच्याकडून वारंवार होणारी पैशाची मागणी यामुळे तणावात आलेल्या गजानन डाहुले या युवकाने आत्महत्या केली, अशी तक्रार मृत गजाननच्या चुलत भावाने मारेगाव पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून रात्री उशिरा मृत गजाननची पत्नी भावना डाहुले हिच्यासह पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले.जोवर मृत गजाननची पत्नी, सासू-सासरे व अन्य लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, तोपर्यंत प्रेत विहीरीबाहेर काढू देणार नाही, अशी भूमिका मंगळवारी टाकळी येथील संतप्त नागरिकांनी घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रेत विहीरीतच होते. याप्रकरणी सायंकाळी मृत गजाननचा चुलत भाऊ नरेश छत्रपती डाहुले याने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर रात्री उशिरा गजाननची पत्नी भावना, सासरा प्रकाश राजूरकर, सासू माला राजूरकर, भावनाचा आजोबा अशोक राजूरकर व चुलत मामा बंडू गौरकार यांच्याविरुद्ध गजाननला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल भादंवि ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.गजानन व भावना या दोघा पती-पत्नीत कोणताही वाद नसताना मागीलवर्षी दिवाळीनंतर भावना तिच्या माहेरी भालर (ता.वणी) येथे वडिलांच्या घरीच राहत होती. गजाननने तिला परत आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र ती नांदण्यासाठी आली नाही. दरम्यान, भावनाच्या आई-वडिलांनी मुलीला पाठवणार नाही, अशी भूमिका घेऊन लग्नात झालेला खर्च म्हणून सात लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्याविरुद्ध खोटी तक्रार करून तुम्हाला अडकवू, अशी धमकी दिली होती. परंतु एवढे पैसे परत करण्याची ऐपत नसल्याने मृत गजाननने पैसे देण्यास नकार दिला. परिणामी भावनाने १७ फेब्रुवारी रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. १९ फेब्रुवारीला पुन्हा भावना व तिच्या नातलगांनी कुंभा बसथांब्यावर गजाननला अडवून सात लाख रुपयांची मागणी केली. तसेच पुन्हा खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे दबावात आलेल्या गजाननने मंगळवारी दुपारी शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी गजाननच्या पार्थिवावर टाकळी येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात शेकडो गावकºयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.