शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

तांडावस्ती विकासाचे पाच कोटी मिळूनही ‘तारीख पे तारीख’

By admin | Updated: June 11, 2016 02:46 IST

शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाला तांडावस्तीच्या विकासासाठी पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहे.

विशेष समाज कल्याण : कामे रखडली, पावसाळ्यामुळे पुन्हा प्रतीक्षा यवतमाळ : शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाला तांडावस्तीच्या विकासासाठी पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहे. मात्र त्यातील कामांची मंजुरी देण्यास हेतुपुरस्सर टाळले जात असल्याचा सूर आहे. प्रत्येक वेळी ‘तारीख पे तारीख’ देऊन लोकप्रतिनिधींनाही फिरविले जात आहे. जिल्ह्यात तांडावस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तांड्यांच्या विकासासाठी शासनाने पाच कोटी रुपये जिल्ह्याला पाठविले आहे. विशेष समाज कल्याण विभागामार्फत हा निधी खर्च केला जातो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हेतुपुरस्सर या निधीतील प्रस्तावांना मंजुरी देणे टाळले जात आहे. समाज कल्याण अधिकाऱ्याकडून प्रत्येक वेळी तांत्रिक तर कधी समितीचा आडोसा घेऊन वेळ मारुन नेली जात आहे. लोकप्रतिनिधींनी विचारणा केल्यास ‘आज करतो, उद्या करतो’ अशी उत्तरे दिली जातात. मात्र प्रत्यक्षात या अधिकाऱ्याचा आज-उद्या अद्यापही निघालेला नाही. पर्यायाने पाच कोटींचा निधी समाज कल्याण विभागाच्या तिजोरीत पडून आहे. वास्तविक आतापर्यंत तांडा वस्तीच्या विकासाची कामे पावसाळ्यापूर्वीच मार्गी लागणे गरजेचे होते. आता मंजुरी झाली तरी ऐन पावसाळ्यात कामे करायची कशी असा प्रश्न निर्माण होणार आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्यच काय तर आमदारांनाही फिरविण्याचे, वेळ मारून नेण्याचे कसब समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त केल्याचे दिसते. त्यामुळेच की काय तांडा वस्तीचे पाच कोटी रुपये पडून असूनही एकाही आमदाराने ते का खर्च होत नाही, म्हणून आक्रमक भूमिका घेतल्याचे अद्याप ऐकिवात नाही. समाज कल्याणच्या या तांडा वस्तीत विकासासाठी स्वतंत्र समिती आहे. परंतु युती शासनाने त्याचे अध्यक्ष नियुक्त केलेले नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत. नेमके हेच कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे. पाच कोटींचा हा निधी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यामागे ‘टक्केवारी’चे गणित असल्याची चर्चा समाज कल्याण विभागात आहे. (प्रतिनिधी)