शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी ४८ संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:40 IST

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी २८ जानेवारीला यवतमाळात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मागणीसाठी प्रथमच लिंगायत समाजाच्या ४८ संघटना एकत्र आल्या असून महामोर्चासाठी राज्यभरातील २ लाख समाजबांधव येणार असल्याची माहिती .....

ठळक मुद्दे२८ ला महामोर्चा : राज्यभरातील समाज यवतमाळात एकवटणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी २८ जानेवारीला यवतमाळात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मागणीसाठी प्रथमच लिंगायत समाजाच्या ४८ संघटना एकत्र आल्या असून महामोर्चासाठी राज्यभरातील २ लाख समाजबांधव येणार असल्याची माहिती मंगळवारी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे निमंत्रक अ‍ॅड. अविनाश भोसीकर, डॉ. अशोक मेनकुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.१०२ वर्षीय राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज, कर्नाटक येथील भालकी मठाचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, कोरणेश्वर आप्पा महाराज आदी संतांच्या उपस्थितीत महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातूनही समाजबांधव सहभागी होणार आहेत. यापूर्वी नांदेड, लातूर, बेळगाव, बेदर, हुबळी, गुलबर्गा, चित्रदुर्ग, म्हैसूर, बंगरूळ, सांगली, विजापूर येथे मोर्चे काढण्यात आले.आता २८ जानेवारीला यवतमाळच्या समता मैदानातून सकाळी १० वाजता महामोर्चा निघणार आहे. नगर पालिका माध्यमिक शाळा, पाचकंदिल चौक, वडगावरोड पोलिस ठाणे, नेताजी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मार्गाने मोर्चा जाणार असून १० महिलांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना निवेदन देणार आहे. मोर्चात येणाºयांसाठी अभ्यंकर शाळा, नंदूरकर विद्यालय, शिवाजी हायस्कूल, अमोलकचंद महाविद्यालय आदी ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. स्वतंत्र धर्माला मान्यता आणि समाजाला अल्पसंख्यकाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा निघणार असून समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.पत्रकार परिषदेला अ‍ॅड. अविनाश भोसीकर, डॉ. अशोक मेनकुदळे, चंद्रशेखर उमरे, डॉ. जयेश हातगावकर, महेंद्र ठोंबरे, नीलेश शेटे, डॉ. किशोर मानगावकर, गिरीश गाढवे, सुरेश शेटे, संतोष नांदेकर, बाळासाहेब दिवे, सुधाकर केळकर, मंगेश शेटे, गजानन हमदापुरे आदी उपस्थित होते.रविवारी दुचाकी रॅलीलिंगायत महामोर्चासाठी ग्रामीण भागात जाऊन समाजबांधवांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तर यवतमाळ शहरात महामोर्चाच्या वातावरण निर्मितीसाठी २१ जानेवारीला दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. येथील महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.