लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामांकरिता दोन हजार ६०० कोटी तर, शकुंतलाच्या ब्रॉडगेजसाठी दोन हजार १०० कोटी रुपये मंजूर झाले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ जानेवारीत होणार असल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी कळविली आहे.रेल्वे मार्गासाठी वर्धा ते यवतमाळपर्यंत जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेले दहा टक्के काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या कामांची शंभर कोटींची निविदाही काढण्यात आली आहे. २०१६-१७ च्या बजेटमध्ये या कामांसाठी रक्कम मंजूर झाली आहे. शकुंतलेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी दारव्हा-कारंजा-मूर्तिजापूर-अचलपूर या लोहमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणारे पोहरादेवी हे तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गावर यावे, यासाठी नऊ किलोमीटरचा मार्ग वाढवून घेतला आहे. यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याचे खासदार भावना गवळी यांनी म्हटले आहे. या दोन्ही रेल्वेंमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. त्यामुळेच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्न दृष्टीपथातच नव्हे तर पूर्णत्वास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेल्वे प्रकल्पांसाठी ४७०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 21:48 IST
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामांकरिता दोन हजार ६०० कोटी तर, शकुंतलाच्या ब्रॉडगेजसाठी दोन हजार १०० कोटी रुपये मंजूर झाले आहे.
रेल्वे प्रकल्पांसाठी ४७०० कोटी
ठळक मुद्देभावना गवळी : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे, शकुंतला ब्रॉडगेज