शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईसाठी तब्बल ४६३ कोटींचे कंत्राट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:35 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेली कित्येक वर्षे बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट स्थानिक पातळीवर दिले जात असताना यावर्षी मात्र पुण्यातील एकाच कंपनीला संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून त्याची किंमत तब्बल ४६३ कोटी एवढी आहे.

ठळक मुद्देपुढील तीन वर्षांसाठी कंत्राटस्थानिक बचतगट व बेरोजगारांच्या पोटावर पाय

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात गेली कित्येक वर्षे बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट स्थानिक पातळीवर दिले जात असताना यावर्षी मात्र पुण्यातील एकाच कंपनीला संपूर्ण राज्यातील बसस्थानकांच्या साफसफाईचे कंत्राट दिले असून त्याची किंमत तब्बल ४६३ कोटी एवढी आहे.प्रत्येक जिल्ह्यातील बसस्थानक, एसटी वर्कशॉप, आगार आदींच्या साफसफाईचे कंत्राट जिल्हास्तरावर विभाग नियंत्रकांच्या अधिकारात दिले जात होते. स्थानिक पातळीवरील सुशिक्षित बेरोजगार संघटना, बचत गट व महिलांच्या अन्य संस्थांना हे छोटेछोटे कंत्राट मिळत असल्याने रोजगार निर्मिती होत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून एसटी महामंडळात ही पद्धत अवलंबिली जात आहे. परंतु यावर्षीपासून या पद्धतीला ब्रेक लावत ४६३ कोटी रुपयांचे साफसफाईचे कंत्राट पुण्यातील एकाच संस्थेला देण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयाने घेतला. पुढील तीन वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. राज्यातील २६८ बसस्थानके, ३१ विभाग नियंत्रक कार्यालये, तीन मध्यवर्ती कार्यशाळा, ३० विभागीय कार्यशाळा, १८ हजार ७०० एसटी बसेस, विश्रामगृहे, पाण्याच्या टाक्यांची साफसफाई, डास निर्मूलन फवारणी आदी जबाबदारी या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी या कंपनीला कामाचे आदेश जारी करण्यात आले असून २ डिसेंबरपर्यंत त्यांना सर्व बसस्थानकांवर आपली यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले गेले आहेत.एकाच कंपनीला साफसफाईचे कंत्राट दिले गेल्याने राज्यभरातील सुशिक्षित बेरोजगार संघटना, बचत गट, महिला संस्थांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. एका कंपनीच्या भल्यासाठी आमचा रोजगार हिरावल्याची भावना बचत गटाच्या महिला व सुशिक्षित बेरोजगार युवक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा