शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

महागाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By admin | Updated: August 15, 2015 02:34 IST

तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणाऱ्या ४६ ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक विभागाने अपात्र ठरविले आहे.

२४५ सदस्यांना नोटीस : खर्चाचा हिशेब सादर न करणे भोवले, निवडणूक विभागाची कारवाईमहागाव : तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च सादर न करणाऱ्या ४६ ग्रामपंचायत सदस्यांना निवडणूक विभागाने अपात्र ठरविले आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करून पाच वर्षासाठी निवडणूक बंदी घालण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. महागाव तालुक्यात २२ एप्रिल रोजी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहभागी अनेक उमेदवारांनी निवडणुकीचा खर्चच सादर केला नाही. खर्च सादर करण्यासाठी प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली. यात महागाव तालुक्यातील २४५ उमेदवारांचा समावेश होता. मात्र यानंतरही त्यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर केला नाही. त्यामुळे ४६ सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले. अपात्र घोषित करण्यात आलेल्यांमध्ये पिंपळगाव ईजाराच्या सुनीता खोकले, नंदा जंगले, अजय पंडागळे, बाळू रणमले पोर्णिमा जंगले, काळी दौ. येथील सरपंच गौतम रणवीर, श्रीनिवास मोरे, अर्चना वाघमारे, सैय्यद इरफान सैय्यद सुलेमान, रमेश ढगे, आशा मानतुटे, चंदा मेटकर, शाहिस्ता परवीन, आस्मा शेख समद यांचा समावेश आहे. काळी येथील १७ पैकी ९ सदस्य अपात्र ठरले आहे. तीवरंग येथील इंदुबाई प्रताप राठोड, सीमा बालूसिंग जाधव, लोहराच्या ज्योती सरगर, चंद्रशेखर सरगर, लेवा येथील अर्चन खंदारे, राजू राठोड, मंगला खंदारे, कासोळाच्या रंजना फोफसे, रुख्माबाई डाखोरे, पृथ्वी चव्हाण, माळकिन्ही येथील मंगू जाधव, बेलदरी येथील निर्मला राठोड, मोहन जाधव, मंगला आडे, भोसाच्या संगीता सोनार, मलकापूरच्या मनाबाई रणमले, गोपिचंद खंदारे, कांताबाई डाखोरे, धनोडा येथील विलास कांबळे, पठाण अमजद शादूल, राजेंद्र घोरपडे, शोभा अडकिणे, गुंज येथील शकुंतला हाके, सुदाम राठोड, शेख फरजाना शेख अफजल, हिवरी येथील श्रीकांत पवार, सीता पवार, सविता चव्हाण, गुलाब पवार, विशाल राऊत, अरुण कुलदीपके, माळवागद येथील अमोल पवार यांचा समावेश आहे. विद्यमान ४६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून, त्यात काही सरपंचही आहेत. काळी दौ. चे सरपंच गौतम रणवीर, कासोळाच्या सरपंच रंजना फोफसे यांचा समावेश आहे. या कारवाईत अनेकांचे धाबे दणाणले आहे. २४५ सदस्यांपैकी काही जणांनी खर्चाचा हिशेब सादर केली, परंतु पोच घेतली नाही. आता त्यांच्याजवळ पुरावा नसल्याने ते काहीही करू शकत नाही. (शहर प्रतिनिधी)सर्वाधिक फटका काळीला अपात्रतेचा सर्वाधिक फटका काळी ग्रामपंचायतीला बसला आहे. येथे भाजपप्रणित पॅनलची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील टेमकर यांच्या गटाचे नऊ सदस्यांचे पद रद्द झाले. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला. यासोबतच पिंपळगाव येथील पाच सदस्यांची पदे रद्द झाली.