शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वाहतूक व्यवस्थेसाठी ४४ लाखांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:46 IST

यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे : यवतमाळ नगरपरिषदेकडे जिल्हा वाहतूक शाखेचा साडेसहा लाखांचा प्रस्ताव

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांनी ४४ लाखांचा संयुक्त आराखडा तयार केला आहे. हा आराखडा पालकमंत्री मदन येरावार यांना सादर करण्यात आला असून या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून निधी मागितला जाणार आहे.यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचा प्रयत्न सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते व त्यांच्या चमूकडून सुरु आहे. रात्री १० पर्यंत वाहतूक पोलीस पार्किंगमधील बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना दिसत आहे. परंतु वाहतूक पोलिसांपुढेही अनेक अडचणी आहेत. शहरात प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी व बाजारपेठेत पिवळे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे वाहनांवर कारवाई करताना जनतेच्या रोषाचा सामना वाहतूक पोलिसांना करावा लागतो. अशीच स्थिती चौकाचौकातील सिग्नलवर पांढºया पट्यांबाबत आहेत. अनेक ठिकाणी पिवळे व पांढरे पट्टे पुसले गेलेले आहेत. शहरात बहुतांश ठिकाणी सूचना फलक, साईन बोर्ड लावले गेलेले नाही. जिथे कुठे असतील त्या बोर्डांची साईज बरीच लहान आहे. त्यामुळे ते वाहनधारकांच्या सहज दृष्टीस पडत नाही. काही ठिकाणी नो-एन्ट्री, प्रवेशास मनाई असे स्पष्ट लिहिण्याऐवजी केवळ ओळख चिन्ह काढले आहे. त्यावरून सामान्य नागरिकाला बोध होत नाही. बहुतांश दत्त चौकात हा प्रकार होतो. एक दिशा मार्गाचा फलक अगदीच लहान व चिन्हांकीत असल्याने नवख्या वाहनधारकाचा गोंधळ उडतो व त्याला वाहतूक पोलिसाच्या चालानच्या कारवाईला सामोरे जावे लागते. सूचना फलक, पट्टे याबाबत वाहतूक पोलिसांनी यवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांकडे वारंवार पत्र दिले. वैयक्तिक संपर्क साधून पाठपुरावा केला. मात्र अद्यापही तातडीने प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कारवाई करताना विचार करावा लागतो आहे.कुणीही अधिकारी वाहतूक शाखेत आला तरी दीड-दोन वर्ष राहील, त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था केवळ अधिकाºयांपुरती मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी शिस्त लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याच एक भाग म्हणून वाहतूक पोलीस शाखेने सुमारे ४४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. या निधीतून संपूर्ण यवतमाळ शहरात ठिकठिकाणी सूचना फलके, साईन बोर्ड व इतर व्यवस्था केल्या जाणार आहेत. नगरपरिषदेलासुद्धा पिवळे व पांढऱ्या पट्ट्यांसाठी साडेसहा लाखांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ४४ लाखांच्या या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आग्रही असल्याचे सांगितले जाते.दरदिवशी २०० वाहनांवर कारवाईजिल्हा वाहतूक शाखेत पूर्वी दिवसभरात सात ते दहा वाहनांवर कारवाई केली जात होती. परंतु आता हा आकडा २०० वर पोहोचला आहे. पूर्वी वातानुकुलीत वाहनातून फिरणारे पोलीस आता हा आकडा गाठण्यासाठी रात्री १० पर्यंत पायदळ फिरताना दिसत आहे. लायसन्स आणि इन्शोरन्सबाबत वाहतूक पोलीस गंभीर आहे. लायसन्स नसल्यास एक हजार रुपये व इन्शोरन्स नसल्यास २३०० रुपये दंड ठोठावला जातो आहे. त्यातही जिल्हा वाहतूक शाखा ही समाजसेवी शाखा, सुधार शाखा असल्याचे मानून ग्रामीण भागातील गोरगरीब व रुग्णालयाच्या कामाने येणाºया वाट चुकलेल्या वाहनधारकांना सुधारणेच्या सूचना देऊन सोडून दिले जात आहे.