शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

एकाच दिवशी ४२३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 5:00 AM

कोरोनावर मात केलेल्या २०८ रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२१० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ३२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,२४७ झाली आहे. यापैकी ३,५७२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १४३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३२७ जण भरती आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्येचा उच्चांक : पाच जणांचा मृत्यू, पुसदमध्ये सर्वाधिक ९१ तर यवतमाळात ७१ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या वेगाने वाढत असून शुक्रवारी दिवसभरात ४२३ पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली. ही आजपर्यंतची एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १४३ झाली आहे.शुक्रवारी मृत झालेल्या पाच जणांमध्ये पांढरकवडा शहरातील ४० वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला, उमरखेड शहरातील ६५ वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ४९ वर्षीय पुरुष आणि आर्णी तालुक्यातील ८४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या ४२३ जणांमध्ये २५२ पुरुष व १७१ महिला आहेत. यात आर्णी शहरातील १७ पुरूष व सात महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, बाभूळगाव शहरातील पाच पुरूष व सात महिला, दारव्हा शहरातील सहा पुरूष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील सहा पुरूष, दिग्रस शहरातील १२ पुरुष व १६ महिला, दिग्रस तालुक्यातील तीन पुरूष, घाटंजी शहरातील नऊ पुरूष व १५ महिला, घाटंजी तालुक्यातील एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरूष, केळापूर तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील १६ पुरूष व ११ महिला, महागाव तालुक्यातील १७ पुरूष व सहा महिला, मारेगाव शहरातील दोन पुरूष व चार महिला, नेर शहरातील तीन पुरुष व चार महिला, नेर तालुक्यातील एक पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील आठ पुरुष व पाच महिला, पुसद शहरातील ५३ पुरूष व ३७ महिला, पुसद तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील १९ पुरुष व ११ महिला, वणी शहरातील १६ पुरुष व १५ महिला, वणी तालुक्यातील तीन पुरूष, वर्धा शहरातील एक पुरूष, यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व २१ महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व एक महिला, झरीजामणी शहरातील एक पुरूष व तीन महिला, झरीजामणी तालुक्यातील दोन पुरूषांचा समावेश आहे.कोरोनावर मात केलेल्या २०८ रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२१० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये ३२६ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,२४७ झाली आहे. यापैकी ३,५७२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १४३ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३२७ जण भरती आहे.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी २८० नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ६०,१६७ नमुने पाठविले असून यापैकी ५७,३५३ प्राप्त तर २८१४ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच ५२,१०६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.नेरमध्ये कोरोनाने तिसऱ्याही भावाचा मृत्यूनेर : कोरोनाचा नेर तालुक्यात कहर झाला आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असतानाच मृत्यू संख्येचा आलेखही वर सरकत आहे. येथील एका कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी याच कुटुंबातील तिसरा ७१ वर्षीय भाऊसुद्धा कोरोनाचा बळी ठरला आहे. अजूनही या कुटुंबातील पाच जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. मेनलाईन परिसरातील हे कुटुंब आहे. नेर शहरात कोरोना बाधितांचा आकडा २२६ वर पोहोचला आहे. सध्या ३६ जण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तालुक्यात कोरोनाबळींची संख्या सहा झाली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी तालुका प्रशासन, नगरपालिका व पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या