शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्हयातील अभियंत्याला ट्रेडिंगमध्ये ४१ लाखांनी गंडविले

By विशाल सोनटक्के | Updated: May 31, 2024 20:20 IST

यवतमाळात फसवणुकीचा प्रकार उघडकीस : शहर पाेलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा नाेंद

यवतमाळ: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसा कमविण्याचे फॅड चांगलेच वाढत चालले आहे. पुणे येथील कंपनीत अभियंता असलेल्या तरुणाला सुरुवातीला नफा मिळताच त्याला आणखी पैसे कमविण्याचा हव्यास चढला. मात्र, विड्राॅल करतेवेळी प्रतिसाद न मिळाल्याने ४१ लाख २५ हजाराने गंडविल्याचे यवतमाळात प्रवासादरम्यान लक्षात आले. याप्रकरणी शुक्रवारी यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात महिलेविरुद्ध तक्रार देण्यात आली.

रुपेश जयदास ठाकरे (३६), रा. हनुमाननगर, तुकून, जि. चंद्रपूर, असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. ताे पुणे येथील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. १८ एप्रिल राेजी २० हजार रुपये गुंतवणूक केली. त्यात त्याला पाच हजार व तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला. ती रक्कम विड्राॅल न करता अधिक लाभापाेटी विविध बॅंक खात्यातून ४१ लाख २५ हजार रुपये गुंतवणूक केली. त्याचा एकूण लाभ एक काेटी २३ लाख रुपये एक्युआरच्या डिमॅट अकाउंटवर दाखविण्यात येत हाेता. पुणे येथून चंद्रपूरकडे जात असताना यवतमाळ येथे पाेहचला. यावेळी पैसाचे काम असल्याने एक्युआरच्या डिमॅट अकाउंटवर सहा लाख ७० हजार रुपये विड्राॅल करण्यासाठी रिक्वेस्ट टाकली. मात्र, पैसे विड्राॅल झाले नाही. कंपनीकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून काेणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे एक्युआर कंपनीद्वारे बनावट ऑनलाईन डिमॅट देऊन फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात येताच रुपेश ठाकरे याने यवतमाळ शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अंजली नामक महिलेविरुद्ध कलम ४२०, भादंवी सहकलम ६६(सी),६६(डि), माहिती तंत्रज्ञान कायदा २०००प्रमाणे गुन्हा नाेंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

म्हणे, दुप्पट व त्यापेक्षाही जास्त पैसेरुपेश ठाकरे हा मागील दाेन वर्षापासून वैयक्तिक शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताे. १ एप्रिल राेजी अंजली नामक महिलेच्या माेबाईलवरून एक्युआर व्हाॅट्स गृपचा मॅसेज आला. एक्युआर नावाने डिमॅट सर्व्हिस देताे. आमच्यासाेबत डिमॅट अकाउंट तयार करून ट्रेडिंग केल्यास पैसे दुप्पट व त्यापेक्षाही जास्त करून देण्याचे आमिष दाखविले. त्यावरून अभियंता तरुणाने लगेच लिंक वरून पाठविलेले अप्लिकेशन डाउनलाेड केले. एका मॅसेजने अभियंता गंडविला गेला.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ