लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंतरराष्ट्रीय योगदिनी ४० हजार यवतमाळकर योगा करणार आहे. त्यासाठी शहरात ४० केंद्रांची निर्मिती करण्यात आली. सकाळी ६ ते ८ या वेळात जिल्ह्यात २०० केंद्रांवर योगा पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजन समितीने २१ जूनला हे आयोजन केले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, पतंजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंग, जनार्धन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. विविध संघटना एकत्रितरीत्या योग दिवस साजरा करणार आहे. महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे.याकरिता शहरात ४० केंद्रावर योग दिवसाची तयारी करण्यात आली आहे. योसाबत जिल्ह्यातील २०० केंद्रावर योग दिवस पार पडणार आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने योगाभ्यासक हजेरी लावणार आहे. संपूर्ण देशभरात ४० मिनिटांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मुख्य कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कारागृह, मेडिकल कॉलेज आणि पोलीस मैदान, दक्षता भवन, नगर परिषद हॉल या ठिकाणी योग दिनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.योगदिनाच्या कार्यक्रमानंतर आयुर्वेद महाविद्यालयातून योग दिंडी काढली जाणार आहे. आरोग्य भारती, क्रीडा भारती, प्रयास, गुरूदेव सेवा मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, सत्यसाई सेवा समिती, स्वच्छता जागृती समिती, प्रजापती ब्रम्हकुमारी शिव योगसंस्था, रोटरी क्लब, रेडक्रॉस सोसायटी, लॉयन्स क्लब, आयएमए, संस्कार कलश, पत्रकार संघ, निमा संघटना, अॅटोरिक्षा चालक मालक संघटना, हिंदू उत्सव सहयोग समिती, ज्येष्ठ नागरिक मंडळ, स्वातंत्रवीर सावरकर मंच, संस्कार भारती, वकील संघटना, आधार फाउंडेशन, अस्तित्व फाउंडेशन, चेंबर आॅफ कॉमर्स या संघटनांचा यात समावेश राहणार आहे. पत्रकार परिषदेला शारीरिक शिक्षण संघटनेचे मनोज येंडे, आर्ट आॅफ लिव्हिंगचे शंतनू शेटे, पतंजलीचे दिनेश राठोड, पतंजली आणि भारत स्वाभिमान पक्षाचे संजय चाफले, जनार्धन स्वामी मंचचे महेश जोशी, पतंजलीच्या माया चव्हाण आदी उपस्थित होते.
४० हजार यवतमाळकर करणार योगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:54 IST
आंतरराष्ट्रीय योगदिनी ४० हजार यवतमाळकर योगा करणार आहे. त्यासाठी शहरात ४० केंद्रांची निर्मिती करण्यात आली. सकाळी ६ ते ८ या वेळात जिल्ह्यात २०० केंद्रांवर योगा पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
४० हजार यवतमाळकर करणार योगा
ठळक मुद्देसंघटना एकवटल्या : जिल्ह्यात २०० केंद्रांवर साजरा होणार आंतरराष्ट्रीय योग दिवस