शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

यवतमाळमध्ये 40 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 16 जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 18:48 IST

यात पांढरकवडा येथील मशीद वार्डातील 17 पुरुष व 14 महिला, पुसद येथील 3 पुरुष व 2 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे. 

यवतमाळ: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज (दि.28) पुन्हा 40 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 16 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मंगळवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 23 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील मशीद वार्डातील 17 पुरुष व 14 महिला, पुसद येथील 3 पुरुष व 2 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 300 होती. यात आज 40 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 340 वर पोहोचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 324 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 292 तर रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले 32 जण आहेत. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 852 झाली आहे. यापैकी 502 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.तर जिल्ह्यात 26 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 100 नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 14251 नमुने पाठविले असून यापैकी 12408 प्राप्त तर 1843 अप्राप्त आहेत. तसेच 11556 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस