शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

राज्यात ४० सायबर पोलीस ठाणी; बाकी काहीच माहिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 07:00 IST

Cyber Police, Maharashtra, Yawatmal News सायबर गुन्हेगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे याबाबतची सविस्तर माहितीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे.

ठळक मुद्देमहासंचालक कार्यालयाकडे अधिकारी, कर्मचारी, पात्रता याची माहितीच उपलब्ध नाही

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सायबर गुन्हेगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असताना राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे याबाबतची सविस्तर माहितीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. राज्यात ४० पोलीस ठाणी आहेत, एवढीच काय ती जुजबी माहिती सांगण्यात आली.नांदेड येथील विधी शाखेचा विद्यार्थी तथा सायबर गुन्हे अभ्यासक मोहंमद उस्मान मोहंमद इलियास या युवकाने पोलीस महासंचालक कार्यालयाला माहिती अधिकारांतर्गत विविध १३ मुद्यांवर ३ ऑगस्ट २०२० ला माहिती मागितली होती. त्यात सायबर पोलीस ठाणे किती, तेथे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे, शैक्षणिक पात्रता, विधी, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्रात किती जणांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतले, सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र निधी मिळतो का, एकूण मनुष्यबळ, वाहने, इमारती, अद्ययावत सॉफ्टवेअर, टुल्स, दीडपट वेतन मिळते का, सायबर गुन्ह्याची तक्रार आल्यास ती त्याच पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून तपास केला जातो का, वर्षभरात राज्यात किती सायबर गुन्हे दाखल झाले, सायबरमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना हॅकर्स शोधण्यासाठी एक्सपर्ट बनविणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षण दिले आहे का, सध्या असे किती प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध आहेत आदी मुद्यांवर ही माहिती विचारली गेली होती.

१५ पैकी केवळ एका मुद्याची माहितीदोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महासंचालक कार्यालयाने १५ पैकी केवळ एका मुद्याची माहिती दिली. राज्यात ४० सायबर पोलीस ठाणी कार्यरत आहेत. इतर मुद्यांची माहिती कार्यालयाच्या अभिलेख्यानुसार उपलब्ध नाही, तरतूद नाही अशा ठरलेल्या शासकीय शब्दात पोलीस उपअधीक्षक विजय खैरे (सायबर विभाग) यांनी कळविली. यावरून सायबर गुन्हेगारीबाबत महाराष्ट्र पोलीस दल खरोखरच किती संवेदनशील आहे हे स्पष्ट होते.ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्यामहत्वाच्या वेबसाईट हॅक करणे, शासनाची गोपनीय माहिती मिळविणे, नागरिकांचे बँक अकाऊंट हॅक करून रक्कम काढणे, परस्पर ऑनलाईन खरेदी, आमिषे दाखवून फसवणूक करणे असे गुन्हे नियमित घडतात. आता कोरोना-लॉकडाऊन काळात सुशिक्षितांची बेरोजगारी वाढल्याने अशा घटना अधिक प्रमाणात घडत आहेत. त्यानंतरही पोलिसांचा खुद्द सायबर क्राईम विभागच अपग्रेड व अपडेट नसल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम