शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

कत्तलीसाठी नेताना २१ बैलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 21:57 IST

मध्य प्रदेशातून नागपूरमार्गे हैद्राबादला गोवंश कत्तलीसाठी नेले जातात. यात मोठे रॅकेट गुंतलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून विविध मार्गाने हे गोवंश जाते. गुरुवारी वडकी पोलिसांनी रात्री १ वाजता पेट्रोलिंगदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर संशयित कन्टेनर अडविला असता त्यामध्ये ५७ बैल कोंबलेले आढळून आले.

ठळक मुद्देवडकीत ब्रेक : ‘एमपी’तून हैदराबादला तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्य प्रदेशातून नागपूरमार्गे हैद्राबादला गोवंश कत्तलीसाठी नेले जातात. यात मोठे रॅकेट गुंतलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातून विविध मार्गाने हे गोवंश जाते. गुरुवारी वडकी पोलिसांनी रात्री १ वाजता पेट्रोलिंगदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर संशयित कन्टेनर अडविला असता त्यामध्ये ५७ बैल कोंबलेले आढळून आले. यातील २१ जनावरांचा मृत्यू झाला होता. उर्वरित जनावरांची पोलिसांनी सुटका केली. सोबतच चार आरोपींना अटक केली.राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरून एच.आर. ३८/एल.२२७३ या कंटेनरमधून जनावरे कत्तलीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून वडकी ठाणेदार प्रशांत गीते यांनी पथकासह सापळा रचून उड्डाण पुलाजवळ ट्रक ताब्यात घेतला. मोहमद राशीद मजीद शॉ (४०) रा.साहरमपूर जि.राजगड, गुलफाम बाबर पठाण (२४) रा.बहादूरनगर ता.नुक्कड, इम्रान खान रहीम खान (२२) रा.निंबूखेडा ता.इचावड, सहीमखॉ अजगरखॉ (१९) रा.कळमनुरी जि.बिदीसा यांना अटक केली. कंटेनरच्या दोन कप्प्यांमध्ये ५७ बैल क्रूर पद्धतीने कोंबण्यात आले होते. यातील २१ बैलांचा मृत्यू झाला तर ३६ बैल जिवंत होते. त्याची सुटका पोलिसांनी केली. या बैलांची बाजारभावाप्रमाणे पाच लाख ७० हजार रुपये किमत आहे व कंटेनरची किमत दहा लाख रुपये असा १५ लाख ८१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रशांत गिते, जमादार अरुण भोयर, किसन सुंकूरवार, हरीष धुर्वे, मिलिंद गोफणे, विकास धडसे, घनश्याम मेसरे, प्रदीप भानारकर, उद्धव घुगे, गौरव नागलकर, जांबूळकर यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी