शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून ३६ शेतकऱ्यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 07:00 IST

यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्दे जनजागृतीवर प्रश्नचिन्ह, सुरक्षा किटची प्रतीक्षाचपुन्हा मृत्यूचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन-तीन वर्षांपूर्वी पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन ८८६ शेतकऱ्यांना उपचारार्थ दाखल करावे लागले होते. तर २२ शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला होता. त्यानंतर कृषी विभागाने फवारणी कशी करावी यावर जनजागृती सुरू केली. मात्र या जनजागृतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण यावर्षी पुन्हा ३६ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे पुन्हा मृत्यूचा धोका वाढला आहे.कीटकनाशक फवारणीतून विषबाधा व मृत्यू झाल्यानंतर राज्यभर खळबळ निर्माण झाली होती. आधीच कर्ज व नापिकीपायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. त्यात कीटकनाशक फवारणीने शेतकऱ्यांपुढे आणखी संकट निर्माण झाल्याने राज्य सरकार व प्रशासनाचा संपूर्ण फोकस यवतमाळवर निर्माण झाला होता. त्यातूनच कृषी विभागाला शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीची जबाबदारी दिली गेली. तर कृषी क्षेत्रातील कंपन्यांना शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरविण्यास सांगण्यात आले होते.

पहिली दोन वर्ष कंपन्यांनी सुरक्षा किट बऱ्यापैकी वाटपही केले. मात्र लाखो शेतकरी आणि किट हजारात अशी तफावत त्यात निर्माण झाली. आता तर कृषी विभागाची जनजागृती आणि किट वाटपही चांगलेच थंडावले. त्यामुळेच की काय ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीतून विषबाधा पुन्हा सुरू झाली आहे. आतापर्यंत ३६ शेतकऱ्यांना ही बाधा झाल्याची नोंद वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दप्तरी नोंद आहे. त्यातील १३ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे.कृषी विभाग व कंपन्या शेतकरी, शेतमजुरांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवतात. शेतकरी पुरेशी काळजी घेत नाही, तोंडाला रुमाल बांधत नाही, फवारणीच्याच हाताने तंबाखू घोटतात, उघड्या अंगाने फवारणी करतात आदी शेतकऱ्यांचे दोष दाखविले जातात. परंतु प्रत्यक्षात त्यात वास्तव नाही. पीक लहान असताना शेतकरी व्यवस्थित फवारणी करतो.

परंतु आता कपाशीची उंची माणसापेक्षाही वाढली आहे. अशा स्थितीत कीटकनाशक फवारणी करताना हात वर न्यावा लागतो व त्यातूनच फवारा चेहऱ्यावर उडतो. उंची वाढलेल्या पिकांवर फवारणी करताना नेमकी सुरक्षा किटची अधिक आवश्यकता असते. मात्र शेतकऱ्यांकडे या किट पुरेशा प्रमाणात पोहोचल्याच नसल्याची माहिती आहे. त्यातूनच विषबाधा प्रकरणे वाढत आहे. कृषी विभागाने आत्ताच याची दखल घेऊन जनजागृती व किट वाटप न केल्यास लगतच्या भविष्यात विषबाधीत शेतकरी-शेतमजुरांची संख्या आणखी वाढण्याची व त्यातून मृत्यूचे संकट उभे राहण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

सिम्बॉलची माहितीच नाहीअनेक प्रकारचे औषधी एकत्र केल्यानंतर त्याचे जहाल औषधी तयार होते. मात्र प्रत्येक औषधांची स्वतंत्र फवारणी करणे शक्य नसल्याने शेतकरी अशा पध्दतीने फवारणी करतात. कुठले औषध किती घातक याचे प्रमाण दर्शविणारे सिम्बॉल औषधांवर असतात. यात रेड ठिपका अतिघातक स्वरूपाचे औैषध म्हणून वापरला जातो. पिवळ्या रंगाचा ठिपका त्यापेक्षा कमी घातक तर ग्रीन ठिपका सर्वाधिक सुरक्षित औषधांसाठी वापरला जातो. ज्या शेतकºयांना इंग्रजी वाचता येत नाही अशा शेतकऱ्यांना हा सिम्बॉल घातकता दर्शवितो. मात्र याची माहिती अजूनही कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना दिली जात नाही. यामुळे शेतकरी फवारणी करताना बिनधास्त असतात.

टॅग्स :Farmerशेतकरी