शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठी अनुदानावर मिळणार 35 हजार क्विंटल गहू, हरभरा बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 21:41 IST

यावर्षीच्या रब्बी हंगामात दोन लाख हेक्टरवर पेरणी करण्याचे  नियोजन कृषी विभागाने तयार केले आहे. यातील निम्म्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याचे नियोजन महाबीज कंपनीने तयार केले आहे. त्याकरिता ३२ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्यात आले आहे. दहा वर्षांखालील आणि दहा वर्षांच्या वरील बियाणाचा यामध्ये समावेश आहे.  ७० रुपये किलोच्या बियाणाला किलोमागे २० ते २५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगाम हातामधून गेल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण मदार रब्बी पिकावर अवलंबून राहणार आहे. या हंगामाकरिता शेतकऱ्यांकडे आर्थिक तरतूद नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा म्हणून  महाबीज कंपनी पुढे सरसावली आहे. ही कंपनी शेतकऱ्यांना अनुदानावर ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ९० हजार शेतकऱ्यांना होणार आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामात दोन लाख हेक्टरवर पेरणी करण्याचे  नियोजन कृषी विभागाने तयार केले आहे. यातील निम्म्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याचे नियोजन महाबीज कंपनीने तयार केले आहे. त्याकरिता ३२ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्यात आले आहे. दहा वर्षांखालील आणि दहा वर्षांच्या वरील बियाणाचा यामध्ये समावेश आहे. ७० रुपये किलोच्या बियाणाला किलोमागे २० ते २५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एका शेतकऱ्याला एक किंवा दोन बॅग दिल्या जाणार आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांना महाबीज कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याकडे संपर्क साधावा लागणार आहे. जिल्ह्यातील ६६३ विक्रेत्यांकडे कंपनीने हे बियाणे उपलब्ध करून दिलेेे आहे.   यामुळे शेतकऱ्यांना खरिपाची लागवड करताना मोठा दिलासा मिळणार आहे.९० ते १०० दिवसात हातात पीक येणाऱ्या वाणावर शेतकऱ्यांनी आपले लक्ष केेेेंद्रित केले आहे.  शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बियाण्याची गुणवत्ता असावी, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

दीड हजार क्विंटल गव्हाचे बियाणे- यावर्षीच्या रब्बी हंगामात महाबीज कंपनी शेतकऱ्यांना गव्हाचे दीड हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहे. एका शेतकऱ्याला पेरणीकरिता एक बॅग दिली जाणार आहे. किलोमागे १५ रुपयाचे अनुदान कंपनी देणार आहे.

अनुदानित बियाणासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधावा लागणार आहे. याशिवाय कृषी विभागातून परमिट मिळविले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. पुरेसे बियाणे बाजारात आहे. - प्रशांत देशमुख, विपणन विभागप्रमुख

परमिट अथवा सातबारा लागेल- अनुदानित बियाणाकरिता शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी नसली तरी ऑफलाइन नोंदणीने बियाणे देण्याचा प्रयत्न होणार आहे. यासाठी कृषी विभागाचे परमिट अथवा ऑनलाइन सातबारा बंधनकारक राहणार आहे. बियाणे वितरणासाठी सोप्या पद्धतीचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांना सहज बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती