आज अखेरचा दिवस : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची निवडणूक, यवतमाळात १२६ अर्जयवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांत नगरसेवक पदासाठी ३४१ नामांकन दाखल झाले असून, शनिवार ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने अर्जाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच नामांकन दाखल करण्याची वेळ एक तासाने वाढवून देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची निवडणूक होऊ घातली असून, २४ आॅक्टोबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला. सुरूवातीच्या दोन दिवसात एकही नामांकन दाखल झाले नाही. २६ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात १२ नामांकन तर २७ आॅक्टोबर रोजी ६० नामांकन दाखल झाले. शुक्रवारी नामांकन दाखल करण्याला वेग आला. शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल २६९ नामांकन दाखल झाले. यवतमाळ नगरपरिषदेत आतापर्यंत १२६ नामांकन दाखल झाले आहे. वणी २४, पुसद ४६, दिग्रस ४५, उमरखेड ३४, दारव्हा ३२, आर्णी १९ आणि घाटंजीत १५ नामांकन दाखल झाले आहेत. यवतमाळ नगरपरिषदेत आतापर्यंत अध्यक्षपदासाठी दोघांनी नामांकन दाखल केले असून, शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली जाणार आहे. शनिवार ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने एक तास वेळ वाढून दिला आहे. आता उमेदवारांना ४ वाजेपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. जिल्ह्यात सर्वात कमी नामांकन घाटंजी नगरपरिषदेसाठी दाखल झाले आहे. १७ जागांसाठी केवळ १५ नामांकन आले. त्यामुळे शेवटच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यासाठी तयारी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
नगरसेवक पदांसाठी ३४१ नामांकन
By admin | Updated: October 29, 2016 00:12 IST