शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३४ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:41 IST

विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात १०४ परीक्षा केंद्र : कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहा भरारी पथकांसह बैठ्या पथकांची राहणार नजर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : विद्यार्थीदशेतील महत्त्वाचा टप्पा असलेली बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून यंदा ३४ हजार ११९ इतके विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत. २१ फेब्रुवारीला पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असून विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागही सज्ज झाला आहे.उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यात बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. जिल्ह्यात यंदाही कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पुढाकरात तयारी पूर्ण झाली असून १०४ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. या केंद्रांवर यंदा एकंदर ३४ हजार ११९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात ३१ हजार ८०६ इतके नियमित परीक्षार्थी असून २ हजार ३१३ विद्यार्थी ‘रिपीटर’ म्हणून परीक्षेला बसणार आहे.विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रावर कॉपीचा प्रकार होऊ नये, यासाठी यंदा प्रत्येक केंद्रावर बैठे पथक देण्यात येणार आहे. या पथकात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच सहा भरारी पथके संपूर्ण जिल्हाभरातील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार आहेत. यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात २ निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात १ आणि डायट प्राचार्यांच्या नेतृत्वात १ अशी सहा भरारी पथके राहणार आहेत. केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून पथकातील अधिकारी आवश्यकता भासल्यास परीक्षा केंद्राचे मोबाईलद्वारे शूटिंग करणार आहेत.तालुकानिहाय परीक्षा केंद्रजिल्ह्यात एकंदर १०४ परीक्षा केंद्र आहेत. त्यात यवतमाळ तालुक्यात १५, नेर ४, दारव्हा ७, दिग्रस ५, आर्णी ७, पुसद १२, उमरखेड ७, महागाव ८, बाभूळगाव ५, कळंब ५, राळेगाव ४, मारेगाव २, पांढरकवडा ८, झरी ३, वणी ७, तर घाटंजी तालुक्यात ५ केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्च अशी महिनाभर परीक्षा चालणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत इंग्रजीचा पेपर आहे. परीक्षार्थ्यांनी अर्धा तास आधीच केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :examपरीक्षा