शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुसदची बस उलटून ३३ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:02 IST

पुसद आगाराच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील रोहडा ते मारवाडी मार्गावर घडली.

ठळक मुद्देपुसद आगाराच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पुसद आगाराच्या धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील रोहडा ते मारवाडी मार्गावर घडली.पुसद आगाराची हिंगोली-पुसद बस (क्रं.एम.एच. १४/बीटी ०९०२) बेलोरा-रोहडा-मारवाडीमार्गे पुसदकडे येत होती. रोहडा-मारवाडी मार्गावर रस्त्यातील खड्यामुळे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटली. बसमधील ५७ प्रवाशांपैकी ३३ प्रवासी जखमी झाले.स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने पुसदच्या एसटीला अपघात हिंगोली-पुसद बसला रोहडा-मारवाडीदरम्यान अपघात झाल्याने चालक-वाहकासह ३३ प्रवासी जखमी झाले.जखमींमध्ये चालक संदीप चव्हाण, वाहक गजानन व्हटगीरे यांच्यासह रजनिकांत धवसे (३०) रा.पातोंडा जि. हिंगोली, प्रकाश ढाले (३५) रा. बासंबा जि. हिंगोली, शेख शहाजहानबी (४०), प्रभाकर वान्हाळे (४९), सिंधु वान्हाळे (३८), शेख मुसा शेख हुसेन (४९), बलवंत झुंझारे सर्व रा. बेलोरा ता. पुसद, काळूबाई राठोड (७०) रा. फेट्रा, सुभाष पोले (४०) रा. जवळा, रामजी वाघमारे (६५), रेणूका वाघमारे दोघेही रा. पारडा जि.हिंगोली, आनंदराव ढाले (६०) रा. पुसद, गोदावरी ढोले (५३) रा. रोहडा, सुभाष मस्के (६०) रा. जामनाईक, शेख परवेज शेख मेहबूब (२५)बराम मारवाडी, प्रकाश ढाले (३५) रा. बासंबा, सोनू चव्हाण (१८) रा. भटसावंगी, अमिनाबी सैयद मुसा (४०) रा. अनसिंग, उमेश जाधव (२८), अंकुश चव्हाण (२५) दोघेही रा. मोहता, गोदावरी राठोड (३५) रा. भटसावंगी, स्वरांजली मस्के (३०) रा. जामनाईक, निर्मला मस्के (६०), गंगाधर मस्के (६५) दोघेही रा. बासंबा, संगिता तडसे (३०), श्रीकांत तडसे दोघेही रा. रोहडा, आदित्या पातोडे (११), कांचन पातोडे (३५) दोघेही रा. पांढुर्णा, उजमाबी शेख मेहबूब (१५) रा. दिग्रस, शेख परवेश शेख मेहबूब (१५), रा. मारवाडी यांचा समावेश आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. जय नाईक, डॉ. उमेश मडावी व चमूने उपचार केले. आमदार मनोहरराव नाईक, भाजपा नेते अ‍ॅड.नीलय नाईक, तहसीलदार डॉ.संजय गरकल, देवानंद ढबाले, साहेबराव ढबाले, विश्वास भवरे, भारत पाटील आदींनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.खड्ड्यांमुळे अपघातरोहडा ते मारवाडी मार्गावरील पूलाजवळ मोठा खड्डा आहे. त्यात बस अडकल्याने स्टेअरिंगचा रॉड तुटला. त्यामुळे अपघात घडल्याचे चालक संदीप चव्हाण व प्रवासी कैलास सोडगीर यांनी सांगितले.