शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

३३ मीटर रुंदीकरणाला वनखात्याची परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या ३३ मीटर रूंदीकरणाला वनखात्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नागपुरात वनभवनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर येथील वनअधिकाऱ्यांनी भरपावसात महामार्गाची प्रत्येक ५० मीटरवर नव्याने रूंदी मोजण्याचे काम हाती घेतले आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. राज्य मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रस्त्याची ...

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : वृक्षतोड ठरली अनधिकृत, आता भरपावसात वनअधिकाऱ्यांची फेरमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या ३३ मीटर रूंदीकरणाला वनखात्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत नागपुरात वनभवनापर्यंत तक्रारी गेल्यानंतर येथील वनअधिकाऱ्यांनी भरपावसात महामार्गाची प्रत्येक ५० मीटरवर नव्याने रूंदी मोजण्याचे काम हाती घेतले आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. राज्य मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाल्याने रस्त्याची रूंदी वाढविली गेली आहे. परंतु दोनही बाजूला वनखात्याची जागा असल्याने त्यात खोदकामासाठी वनविभागाची परवानगी गरजेची आहे. या महामार्गाची रूंदी ४५ मीटर अर्थात १५० फूट असल्याचे अभिलेख्यात नमूद आहे. त्यानुसार १२ ते ४५ फूट या रूंदीची वनखात्याकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रितसर परवानगी घेणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात त्यांनी केवळ ३० ते ४५ मीटर एवढ्याच जागेतील रूंदीकरणाची परवानगी घेतली. त्यामुळे उर्वरित ३३ मीटर जागेच्या रूंदीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष असे, या सर्व ४५ मीटर रूंदीकरणाच्या जागेत येणाऱ्या सागवान वृक्षांची तोडही करण्यात आली. या प्रकारामुळे महामार्ग प्राधिकरणच नव्हे, तर स्थानिक वनखात्याची यंत्रणाही अडचणीत आली आहे. स्थळ पंचनामा करून तत्कालीन सीसीएफने परवानगी दिल्याची नोंद आहे. मात्र त्यांचे हे परवानापत्रच आता संशयाच्या भोवºयात सापडले आहे. त्यांनी स्थळाला प्रत्यक्ष भेट दिली की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.२५ आॅक्टोबर १९८० ला असलेली महामार्गाची रूंदी ग्राह्य धरावी, असे बंधन आहे. मात्र ते बंधन झुगारून वनखात्याने आपल्या मर्जीनेच रूंदीकरणाची परवानगी दिली. विशेष असे, महामार्गाने या संपूर्ण ४५ मीटर रस्त्याच्या मालकीचा दाखलाही (२५/२) तहसीलदारांकडून मिळविलेला नाही. रस्त्याचे नियमबाह्य रूंदीकरण करताना शासनाच्या जमीनीच नव्हे तर अनेक खासगी शेतांमध्येही महामार्गाच्या कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. त्याच्या भूसंपादनाचा पैसाही सदर शेतकऱ्याला मिळालेला नाही. हे रूंदीकरण करताना केंद्र शासनाच्या १४ अटींची पूर्तता केली गेली नाही. वृक्षतोड करताना झाडोरा आगारात आणला गेला नाही. सरकारी संपत्तीवर दरोडा घालण्याचा हा प्रकार असून त्याला स्थानिक वनयंत्रणेने अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचे दिसून येते.परवानगी संशोधनाचा विषयरूंदीकरणाच्या जागेची मालकी नसताना वनखात्याने त्यावरील झाडे तोडण्याची परवानगी महामार्ग प्राधिकरणाला दिली कशी, हाच संशोधनाचा विषय आहे. रूंदीकरण व वृक्षतोड गाजत असल्याने वनखात्याने आता या राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाची नव्याने मोजणी चालविली आहे. प्रत्येक ५० मीटरवर टेप लाऊन रूंदी मोजली जात आहे. भरपावसात वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी या महामार्गावर रूंदीकरणाची मोजणी करताना दिसत आहेत. यात हलगर्जीपणा करणाºया यंत्रणेवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गforest departmentवनविभाग