शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

३२४३ प्रकरणात तडजोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:31 IST

जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ८३९ प्रलंबित आणि दोन हजार ४०४ वादपूर्व असे तीन हजार २४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय लोकअदालत : सहा कोटी रुपये तडजोडमूल्य, २४०४ खटले वादपूर्व

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ८३९ प्रलंबित आणि दोन हजार ४०४ वादपूर्व असे तीन हजार २४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. या प्रकरणांचे एकूण तडजोडमूल्य सहा कोटी पाच लाख ५८ हजार ९१ रुपये इतके होते. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर विविध राष्ट्रीयकृत बँकांची वादपूर्व प्रकरणे होती.आपसी तडजोडीने प्रकरणे मिटविण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष संदीपकुमार मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुरेश राजुरकर यांच्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यरत न्यायाधीशांनी प्रयत्न केले. वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्था आणि राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकाºयांच्या बैठकी घेऊन त्यांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्त्व पटवून देण्यात आले होते.रविवारी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये तीन हजार २४३ प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संदीपकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनात ही लोकअदालत पार पडली. लोकअदालतीसाठी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्यासह विविध सिंचन प्रकल्प, सहकारी बँका, विमा कंपन्या, पोलीस विभाग, नगरपरिषद यांच्यासह जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक आदींचे सहकार्य लाभले.