शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

३२ लाखांची संशयास्पद रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:03 IST

तवेरा वाहनातून शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली.

ठळक मुद्देमोहा फाट्यावर कारवाई : टोळीविरोधीपथकाने चौघांना अटक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : तवेरा वाहनातून शहरात येणारी ३२ लाख रुपयांची संशयास्पद रोकड बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या मोहा फाटा येथे पोलिसांनी जप्त केली. या रकमेबाबत कुठलाही अधिकृत पुरावा देऊ न शकल्याने वाहनातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई टोळीविरोधी पथकने केली.अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेकडून यवतमाळकडे तवेरा कार (एम.एच.१८-डब्ल्यू-५५३४) बुधवारी रात्री यवतमाळकडे येत होते. मोहा फाट्यावर टोळीविरोधी पथकाने तपासणी दरम्यान सदर कार थांबविली. झडती घेतली असता कारमध्ये प्लास्टिकच्या पोत्यात ३२ लाख १३ हजार ८०० रुपयांची रोकड आढळून आली. यात दोन हजार, पाचशे, दोनशे व १०० रुपयांच्या नोटांचे बंडल होते.या रकमेबाबत वाहनातील राजेश रामलू बत्तीनीवार (४०) रा. चनाखा ता. पांढरकवडा, श्रीहरी लिंगय्या यादगीरीवार (५७) रा. शिरपूर जि. धुळे, देवराव आसन्ना रोडडावार (३३) रा. चनाखा ता. पांढरकवडा, बालराज राजेय्या कंकेटीवार (३८) रा.पेददाकोडू जि. सिंददीपेठ (तेलंगणा) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ही रक्कम कोठून तरी चोरुन, लुटून किंवा फसवणूक करून आणल्याचा संशय बळावल्याने या सर्वांना ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष मनवर, सहायक फौजदार ऋषि ठाकूर, जमादार संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, जयंत शेंडे, राजू कांबळे, श्रीधर शिंदे, नीलेश पाटील, आकाश सहारे यांनी केली.