शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
2
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
3
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
4
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
5
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
6
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
7
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
8
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
9
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
10
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
11
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
12
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
13
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
14
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
15
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
16
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
17
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
18
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
19
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
20
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा उंबरठा ओलांडणारी ३१४ जोडपी ‘कन्यादान’पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

जिल्ह्यात २०१७-१८  या वर्षापासून शासकीय कन्यादान योजनेसाठी शासनाने निधीच पाठविलेला नाही. या दोन वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील ३१४ जणांनी आंतरजातीय विवाह केले. हा आकडा या पेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र शासकीय अनुदानासाठी ३१४ जणांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज केल्यामुळे तेवढाच आकडा रेकाॅर्डवर आला आहे. प्रत्यक्षात या ३१४ जोडप्यांनाही दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अनुदान मिळाले नाही.

ठळक मुद्देदोन वर्षांपासून शासकीय अनुदान मिळाले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाजातील जातीव्यवस्था झुगारुन आंतरजातीय विवाह करणे, ही बाब आजच्या आधुनिक जगातही अत्यंत हिमतीची आहे. असा विवाह करणाऱ्यांना बऱ्याचदा आप्त मित्र आणि स्वत:च्या कुटुंबापासून वेगळे राहण्याची परिस्थिती ओढवते. त्यामुळे जातीचा उंबरठा ओलांडून विवाह करणाऱ्यांना किमान आधार मिळावा यासाठी शासनाने ‘कन्यादान योजना’ सुरू केली. मात्र इथेही शासकीय उदासीनतेचा फटका बसला. गेल्या दोन वर्षांपासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाचे अनुदानच देण्यात आलेले नाही.जिल्ह्यात २०१७-१८  या वर्षापासून शासकीय कन्यादान योजनेसाठी शासनाने निधीच पाठविलेला नाही. या दोन वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील ३१४ जणांनी आंतरजातीय विवाह केले. हा आकडा या पेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र शासकीय अनुदानासाठी ३१४ जणांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज केल्यामुळे तेवढाच आकडा रेकाॅर्डवर आला आहे. प्रत्यक्षात या ३१४ जोडप्यांनाही दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मनोदय केवळ कागदोपत्री दिसून येत आहे. या योजनेत प्रत्येक जोडप्याला ५० हजार रुपयांचे अनुदान धनादेशाद्वारे दिले जाते. पूर्वी काही अनुदान रोख स्वरूपात तर काही वस्तू स्वरूपात दिले जात होते. त्यावेळी अनुदानाची रक्कमही केवळ १५ हजार रुपयापर्यंत मर्यादित होती. २०१० पासून अनुदानाची रक्कम ५० हजार रुपये करण्यात आली आहे. जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षात १११ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह करून अनुदानासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मार्च २०१७ पर्यंत ५५ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वाटपही करण्यात आले. मात्र २०१७-१८ पासून अनुदानच न आल्याने ३१४ जोडपे अनुदानापासून वंचित आहे.

अशी मिळते मदत१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते. 

जिल्ह्यात २०१७-१८ पासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान देण्यासाठी शासकीय निधीच आलेला नाही. त्यामुळे ३१४ जोडप्यांचे अनुदान प्रलंबित आहे. परंतु हे अनुदान येत्या १५-२० दिवसात मंजूर होऊन जिल्ह्याला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लाभार्थ्यांंना वाटप केले जाईल.           - सचिन महल्ले, समाज कल्याण निरीक्षक.

शासकीय योजनेतून यांना मिळते मदत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासकीय कन्यादान योजनेतून अर्थसहाय्य दिले जाते. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी आदी मागास प्रवर्गातील एखाद्या व्यक्तीचा इतर मागासवर्ग किंवा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसोबत विवाह झाल्यास असे जोडपे शासकीय मदतीला पात्र ठरतात. शिवाय एका मागास प्रवर्गातील व्यक्तीने दुसऱ्या मागास प्रवर्गातील व्यक्तीसोबत विवाह केला तरी ते जोडपे मदतीसाठी पात्र ठरतात. 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना