शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

रातोरात लागली लाॅटरी... तीन हजार तरुणांना सरकारी नोकरी !

By अविनाश साबापुरे | Updated: June 27, 2024 16:38 IST

पवित्र पोर्टलमधून निवड : लवकरच कागदपत्र पडताळणीनंतर शिक्षकांना नियुक्ती

अविनाश साबापुरेयवतमाळ : सरकारी नोकरी लागावी म्हणून रात्रंदिवस वाट पाहणाऱ्या तीन हजार तरुणांना अचानक लाॅटरीच लागली आहे. आपल्या भविष्याचे काय होईल या चिंतेत मंगळवारी रात्री झोपी गेलेल्या तरुणांना बुधवारी सकाळी अचानक नोकरी लागल्याचा एसएमएस मिळाला. बेरोजगारीची अंधारी रात्र सरली अन् शिक्षक होण्याचे स्वप्न साकार झाले ! ही किमया घडली पवित्र पोर्टलमुळे. शिक्षक भरतीसाठी शासनाने २०२३ मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात अभियोग्यता चाचणी घेतली होती. २१ हजार ६७८ पदांसाठी झालेल्या या परीक्षेला लाखो डीएड, बीएडधारक बसले होते. त्यातून यंदा २६ फेब्रुवारीला पहिली निवड यादी प्रसिद्ध करुन तब्बल ११ हजार ८५ तरुणांची शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. परंतु, अजूनही अनेक नोकरीपासून वंचित राहिलेले आहेत. अशा वंचितांसाठी बुधवारची सकाळ खूशखबर घेऊन आली.

 

पवित्र पोर्टलद्वारे मंगळवारी रात्री रुपांतरण फेरीतील (कन्व्हर्झन राउंड) निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ३ हजार १५० उमेदवारांचा समावेश आहे. यातील काही उमेदवार जिल्हा परिषदेच्या तर काही महापालिकांच्या शाळांसाठी निवडले गेलेले आहेत. त्यांची नावे संबंधित जिल्हा परिषद व महापालिकांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या लाॅगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. आता या उमेदवारांच्या कागदपत्रांची कागदपत्र पडताळणी करुन त्यांना लवकरात लवकर नियुक्त द्यावी, असे आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी बजावले आहेत. 

अशी होतेय शिक्षक भरती...- अभियोग्यता परीक्षा : फेब्रुवारी-मार्च २०२३- एकूण जागा : २१,६७८- पहिली निवड यादी : २६ फेब्रुवारी २०२४- पहिल्या यादीत निवडलेले उमेदवार : ११०८५- दुसरी निवड यादी (रुपांतरण) : २५ जून २०२४- दुसऱ्या यादीत निवडलेले उमेदवार : ३,१५०- आता उर्वरित जागा (मुलाखतीशिवाय) : २,५६४- आता उर्वरित जागा (मुलाखतीसह) : ४,८७९

दीड हजार विषय शिक्षक मिळालेकन्व्हर्टेड राउंडद्वारे पहिली ते पाचवीचे शिक्षक म्हणून १६५७ जणांची निवड झाली. त्यात इंग्रजी माध्यमासाठी ७०२, मराठी माध्यमासाठी ७६०, उर्दू माध्यमासाठी ९५, हिंदी माध्यमासाठी ९१ तर कन्नड माध्यमासाठी ९ जणांची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय सहावी ते आठवीच्या वर्गाचे विषय शिक्षक म्हणून १४८३ जणांची शिफारस झाली आहे. त्यात गणित-विज्ञानासाठी १३८२, सामाजिकशास्त्रासाठी ३ आणि भाषा विषय शिक्षक़ म्हणून ९८ जणांची निवड झाली आहे. परंतु, नववी आणि दहाव्या वर्गावर माध्यमिक शिक्षक म्हणून केवळ १० जणांची या राउंडमध्ये निवड झाली आहे.

आरक्षणानुसार मिळालेच नाही उमेदवार२६ फेब्रुवारीला मुलाखतीशिवाय निवडायच्या १६ हजार ७९९ उमेदवारांपैकी ११ हजार ८५ उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. त्यातून ५ हजार ७१४ जागा पात्र उमेदवारांअभावी उरल्या होत्या. त्यानंतर आता २५ जून रोजी यातील ३ हजार १५० जागा कन्व्हर्टेड राउंडद्वारे भरण्यात आल्या. तर अजूनही २ हजार ५६४ जागा त्या-त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार न मिळाल्याने रिक्त आहेत. आता मुलाखतीसह होणाऱ्या नियुक्त्यांकरिता पोर्टलद्वारे शिफारस कधी होणार याकडे बीएडधारकांच्या नजरा आहेत.

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीTeachers Recruitmentशिक्षकभरतीYavatmalयवतमाळ