शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

28 लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 05:00 IST

या वाहनात वरच्या बाजूने प्लास्टिकचे कॅरेट होते. या कॅरेटचे वजन कमी असतानाही वाहनाचे टायर दबून असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून मराठवाकडी गावाजवळ हे वाहन अडविले. वाहन थांबवून त्या वाहनाचा चालक एन. मंजूनाथा नारायणा रेड्डी (रा. कदाबूर, कर्नाटक) याला विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात प्रतिबंधित बियाणे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणबोरी : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले कपाशीचे बियाणे कर्नाटकात खरेदी करून ते बोलेरो पीक वाहनाने नागपूरकडे नेले जात असताना पाटणबोरी ते पांढरकवडा राष्ट्रीय महार्गावरील मराठवाकडी गावाजवळ पांढरकवडा पोलिसांनी हे वाहन अडवून २८ लाख ५२ हजार ३१० रुपये किमतीचे बियाणे जप्त केले. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पाटणबोरी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी हे ८ एप्रिलच्या रात्री राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालीत असताना, अदिलाबाद-नागपूर मार्गावर एक बोलेरो पिकअप वाहन येत असल्याचे दिसले. या वाहनात वरच्या बाजूने प्लास्टिकचे कॅरेट होते. या कॅरेटचे वजन कमी असतानाही वाहनाचे टायर दबून असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून मराठवाकडी गावाजवळ हे वाहन अडविले. वाहन थांबवून त्या वाहनाचा चालक एन. मंजूनाथा नारायणा रेड्डी (रा. कदाबूर, कर्नाटक) याला विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यात प्रतिबंधित बियाणे आढळून आले. यावेळी वाहनात  व्यंकटेश्वरराव आदिनारायणा डग्गुबाती (मारतुरू, आंध्र प्रदेश) हादेखील होता. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता, त्याने हे बियाणे कर्नाटक राज्यातील गौरीबिदनूर येथील गंगारेड्डी नावाच्या इसमाकडून विकत घेतल्याचे सांगितले. या कारवाईनंतर कृषी अधिकारी सुरेश चव्हाण, राजेंद्र माळोदे, बियाणे निरीक्षक नीलेश ढाकुलवार, कृषी अधिकारी पंकज बरडे यांनी  या अनधिकृत बियाणांचा पंचनामा केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धारणे, एसडीपीओ प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात एपीआय हेमराज कोळी, जमादार वसंत चव्हाण, शिपाई शंकर बारेकर, राजू सुरोशे, सिद्धार्थ कांबळे यांनी केली.

बियाणाची १४०० पाकिटे पोलिसांनी केली जप्त- भागात मी मक्त्याने शेती करीत असून त्यासाठी व काही आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी हे बियाणे घेऊन जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  वाहनात काव्या नावाचे एक हजार ४०० पाकीट (किंमत १३ लाख दोन हजार), पवनी सीडस् १६०० पाकीट (किंमत १४ लाख ८८ हजार), ३० किलो खुले बियाणे (किंमत ६२ हजार ३१० रुपये), असे एकूण २८ लाख ५२ हजार ३१० रुपयांचे बियाणे आढळून आले.  हा सर्व मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. 

 

टॅग्स :Policeपोलिस