राष्ट्रीय पेयजल योजना : १२ ठिकाणी अपहार, समिती सदस्यांवर कारवाई होणार यवतमाळ : राष्टीय पेयजल योजनेतील अर्धवट असलेल्या २६ नळयोजना कायमस्वरूपी गुंडाळण्याचा निर्णय जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. या योजना विविध कारणाने २००६ पासून रखडल्या होत्या. तर १२ ठिकाणी अपहार झाल्याचे पुढे आल्याने ग्रामसचिव, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्षासह सदस्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.गावा गावात वर्षोनगणती असलेली पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना अस्तित्वात आणली. प्रथमच नळयोजनेचे काम करण्याचा अधिकारी गावातील पाणी पुरवठा आणि दक्षता समितीला देण्यात आला. ग्रामस्थांनाच योजनेचे काम करण्याचा अधिकार देण्यामागे वेळेत काम पूर्ण करून भष्ट्राचाराला पायाबंद घालणे हा होता. प्रत्यक्षात मात्र योनजेच्या मुळ उद्देशालाचा हरताळ फासण्यात आला. अनेक गावात योनजच्या पैशाची उचल करून परस्पर खर्च केले. नळयोनजेचे कामच करण्यता आले नाही. याबाबत जिल्हा परिषदेकडून सातत्याने चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला. मात्र यातूनही काहीच साध्य होत नसल्याने २००६ पासून विविध कारणाने रखडलेल्या नळ योजनेचे काम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय चौकशीमध्ये १२ गावातील नळ योजनेच्याकामात अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील ग्रामसचिव, सरपंच, पाणीपुरवठा समिती अध्यक्षासह सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे. भष्ट्राचाराची कीड लागल्याणे आता ही गावे कायमस्वरूपी तहानलेली राहणार आहे. याला जबाबदार कोण हा प्रश्न मात्र सध्यातरी निरूत्तरीत आहे. गावकरी शुद्ध आणि मुबलक पाण्याला कायमचे मुकणार हे मात्र निश्चत. (कार्यालय प्रतिनिधी)
२६ अर्धवट नळयोजना गुंडाळल्या
By admin | Updated: January 6, 2015 23:07 IST