शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२६ पेट्रोलपंपांची तपासणी, केवळ दोघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:18 IST

वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २६ पेट्रोल पंपांची तपासणी केली. मात्र केवळ दोन ठिकाणी कारवाई केली. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.

ठळक मुद्देकमी इंधनाची समस्या कायम : वैधमापन शास्त्र विभाग उदासीन, ग्राहकांची लूट सुरूच

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २६ पेट्रोल पंपांची तपासणी केली. मात्र केवळ दोन ठिकाणी कारवाई केली. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरून पेट्रोल कमी मिळत असल्याची ओरड वाहनधारकांमधून नेहमीच ऐकायला मिळते. अनेकदा त्यातून वादही होतात. परंतु प्रत्येक वेळी ही बाब सिद्ध करणे कठीण जात असल्याने पेट्रोल पंपांची कारवाईतून सुटका होते. पेट्रोल पंपाच्या तपासणीची जबाबदारी शासनाच्या वैधमापन शास्त्र विभागावर आहे. या विभागाच्या कामगिरीचा माहिती अधिकारातून आढावा घेतला असता आठ ते नऊ तालुक्यात पेट्रोल पंपांची तपासणीच झाली नसल्याची गंभीरबाब उघड झाली.वैधमापन शास्त्र विभाग यवतमाळ येथे सहायक नियंत्रकांना ३० जुलै २०१७ ला माहिती अधिकारात माहिती मागण्यात आली होती. २७ आॅक्टोबर २०१७ ला ही माहिती देण्यात आली. त्यानुसार १ एप्रिल ते ३९ जुलै २०१७ या काळात जिल्ह्यातील एकूण २६ पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुसद दोन, दिग्रस दोन, आर्णी दोन, नेर तीन, दारव्हा सहा, बाभूळगाव एक, उमरखेड एक, वणी चार तर पांढरकवड्याच्या चार पेट्रोल पंपांचा समावेश आहे. यापैकी आर्णीतील एक व वणीतील एका पेट्रोल पंपांवर गैरप्रकार आढळून आला. त्यामुळे त्यांच्यावर वैधमापन कायदा २००५ च्या कलम ३०८ अ अन्वये कारवाई करण्यात आली. येथील एका राजकीय नेत्याने पेट्रोल पंप भाड्याने दिला होता. त्यात चीप आढळून आली. त्यामुळे या राजकीय नेत्याला ठाणे जिल्ह्यात पोलिसांसमोर पेश व्हावे लागले होते. वैधमापन शास्त्र विभागान गेल्या वर्षात यवतमाळ, कळंब, राळेगाव, मारेगाव, घाटंजी, महागाव, झरी या तालुक्यातील एकाही पेट्रोल पंपाची तापसणी केल्याची नोंद नाही.केवळ ११ जिनिंग काट्यांची तपासणीयवतमाळ हा बहुतांश कापूस उत्पादक जिल्हा असल्याने येथे कापसाची हजारो कोटींची उलाढाल होते. सीसीआय व पणन महासंघासोबतच सर्वाधिक खासगी खरेदी कापसाची केली जाते. बाजारात हमी भावापेक्षा जास्त भाव असल्याने पणन व सीसीआयला कापूस मिळत नाही. पर्यायाने खासगी बाजारातच सर्वाधिक उलाढाल राहते. अनेक ठिकाणी कापूस खरेदीत शेतकऱ्यांची लूट होते. जाणीवपूर्वक कमी कापूस मोजला जातो. त्यात शेतकºयाची फसवणूक होते. सर्वच भागात ही ओरड असताना वैधमापन शास्त्र विभागाने आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ या वर्षभरात जिल्ह्यात केवळ ११ ठिकाणी जिनिंगच्या वजन काट्याची तपासणी केली. त्यात कळंब एक, वणी चार, आर्णी तीन, दारव्हा दोन तर महागावच्या एका जिनिंग काट्याचा समावेश आहे. अन्य तालुक्यामध्ये एकाही जिनिंग काट्याची वर्षभरात तपासणी झाली नसल्याचे स्पष्ट होते. राळेगाव, पांढरकवडा, पुसद या भागात सर्वाधिक कापसाचे उत्पादन व खरेदी-विक्री होत असताना तेथील एकाही वजन काट्याची तपासणी न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. त्यामुळेच येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाच्या कारभाराभोवती प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप