शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आश्रमशाळेचा २४ क्ंिवटल गहू जप्त

By admin | Updated: November 16, 2016 00:27 IST

अनुसूचित जाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी असलेल्या गहू परस्पर घरी नेण्याचा प्रकार पुरवठा विभागाच्या धाडीत उघडकीस आला.

यवतमाळ : अनुसूचित जाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी असलेल्या गहू परस्पर घरी नेण्याचा प्रकार पुरवठा विभागाच्या धाडीत उघडकीस आला. शहरातील विवेकानंद सोसयाटीतील एका घरात तब्बल २४ क्ंिवटल गहू रंगेहाथ पकडण्यात आला. ही कारवाई मंगळावारी दुपारी करण्यात आली. येथील आंबेडकरनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती निवासी आश्रम शाळा आणि मातोश्री भीमाई अनुसूचित जाती आश्रमशाळा धानोरा (ता. बाभुळगाव) येथे पुरवठा करण्यासाठी शासकीय गोदामातून २४ क्विंटल गहू काढण्यात आला. त्यासाठी चलान क्रमांक ६४ नुसार ८ नोव्हेंबरला गव्हाची उचल करण्यात आली. हा गहू मेटॅडोअर (क्रं.एम एच ३७ एम ६००९) या वाहनातून विवेकानंद सोसायटीतील उत्तमराव गजानन चंदने यांच्याकडे उतरविल्या जात असल्याची गोपनिय माहिती पुरवठा विभागाला मिळाली. त्यावरून मंगळवारी दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, तहसीलदार सचिन शेजाळ, पुरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांनी धाड मारली. येथे आरोपीने त्यांच्या घरात सात क्विंटल गहू उतरविला होता तर उर्वरीत गहू हा मेटॅडोअर मधून उतरविने सुरू होते. पुरवठा विभागाच्या पथकाने पंचनामा करून धान्याने भरलेला मेटॅडोर वडगावरोड पोलीसांच्या स्वाधिन केला. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांच्या तक्रारीवरून वाहन चालक रघुनंदन रामस्वरूप चपरिया आणि घरमालक उत्तमराव गजानन चंदणे यांच्या विरोधात जीवनावश्यक कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुरवठा विभागाच्या कारवाईने पून्हा एकदा आश्रमशाळेच्या धान्याचा काळबाजार उघड झाला. आता या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास धान्य काळ््या बाजारात विकणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अन्यथा दोघांवर कारवाई करून प्रकरण थंडबस्त्यात ठेवल्यास या रॅकेटमधील बड्या माश्यांना अभय देण्याचेच काम होईल. (कार्यालय प्रतिनिधी)