शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह अनुदानाची २३० लाभार्थ्यांना प्रतीक्षा ; मागणी करूनही निधी मिळालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 18:23 IST

Yavatmal : आंतरजातीय विवाह अनुदानाचे एक कोटी दहा लाख रुपये हवे

सूरज पाटील लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाजातील जातीयता संपविण्यासाठी आंतरजातीय विवाह योजना राबविण्यात येते. मागील काही वर्षात आंतरजातीय विवाह करण्याकडे युवापिढीचा कल वाढत आहे. समाजकल्याण विभागाकडून अनुदान मिळत असले तरी त्याला विलंबाचा आजार जडला आहे. अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेल्या लाभार्थ्यांनी मागील दोन वर्षात जिल्हा परिषदेलाच सातफेरे मारले आहे. मात्र, अजूनही २३० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. तर, समाजकल्याण विभागाने शासनाकडे एक कोटी दहा लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

जग बदलत असल्याचा गवगवा केला जात असला तरी जातीय विषमता माणसाच्या मनातून कायमची दूर झाली नाही. काही ठिकाणी आंतरजातीय विवाह केल्यास 'सैराट' घडविल्या जाते. मात्र, 'साथ जियेंगे साथ मरेंगे'च्या आणाभाका घेत अनेक जण आंतरजातीय विवाह करतात. या विवाहाला कुटुंबातून विरोध होत असल्याने प्रसंगी घरही सोडावे लागते. अशावेळा आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. अनेकांसाठी आंतरजातीय विवाह अनुदानाची रक्कम मोलाची असते. मात्र आंतरजातीय विवाह केलेल्या २३० जोडप्यांनी समाजकल्याण विभागात अर्ज केले. वारंवार फेरे मारून त्यांना निधी यायचा आहे, असे एकूणच आल्या पावली परत फिरावे लागले आहे. लाभार्थ्यांसाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, अशा मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी लवकरच येणार असल्याचे संकेत आहे. 

आता तपासले जातेय परिपूर्ण प्रस्तावआंतरजातीय विवाहाच्या अनुदानासाठी प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी त्यात कोणत्या त्रुटी आहेत का, याची काटेकोर तपासणी केली जात आहे. यात कागदपत्रांची कमतरता असल्यास परिपूर्ण प्रस्तावच सादर करण्याचा सल्लाही दिला जात आहे.

५० हजारांच्या अनुदानातून दिलासा मिळण्याचे संकेतआंतरजातीय विवाह अनुदानाचा २ निधी लवकरच प्राप्त होण्याचे संकेत समाज कल्याण विभागाने दिले आहेत. एक कोटी दहा लाखांचा निधी प्राप्त झाल्यास ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. ५० हजार रुपयाचे अनुदान 'पीएफएमएस' प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा होईल.

त्रुटींच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र पथक नेमले१ २६ लाभार्थ्यांच्या प्रस्तावात त्रुटी निघाल्या आहे. त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी समाजकल्याण विभागाने पथक नेमले आहे. पथकातील कर्मचारी दिलेल्या पत्त्यावर जाऊन त्रुटींची पूर्तता करण्यास सांगत आहे. तर काही जण गावात मिळाले नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे.

२३० जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला आहेआंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. मात्र या अनुदानासाठी आता प्रतीक्षा करावी लागत आहे. असे जोडपे येरझारा मारताना झेडपीत दिसतात.

"आंतरजातीय विवाह अनुदानासाठी एक कोटी दहा लाखांच्या निधीची मागणी केली आहे. लवकरच निधी प्राप्त होणार आहे. ज्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावात त्रुटी निघाल्या. त्यांचा शोध घेऊन दुरुस्ती करून घेतली जात आहे. प्राधान्यक्रमानेच निधीचे वितरण होईल. लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करताना त्यात कोणतीही त्रुटी राहणार नाही. याची खात्री करून घेतली पाहिजे."- पीयूष चव्हाण, समाजकल्याण अधिकारी

टॅग्स :Yavatmalयवतमाळ