शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वर्षभरात १७ जिल्ह्यात २१०० बालमृत्यू; सर्वाधिक नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 11:58 IST

बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनाची यादी लांबलचक आहे. तरीही राज्यातील बालमृत्यूचा आलेख चढता आहे.

ठळक मुद्दे अमरावती तिसऱ्या क्रमांकावर नवसंजीवनी योजनेचे फलित काय?

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनाची यादी लांबलचक आहे. तरीही राज्यातील बालमृत्यूचा आलेख चढता आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात २१०६ बालमृत्यूची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ४५१ नाशिकमधील आहेत. त्या खालोखाल नंदूरबार ४२६, तर अमरावती जिल्ह्यात ४०९ बालमृत्यू झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २९ मे रोजी गाभा समितीच्या बैठकीनिमित्त तयार केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.नवसंजीवनी योजना राबविल्या जात असलेल्या जिल्ह्यातील बालमृत्यूचे आकडे आरोग्यसह विविध विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गर्भवती माता ते सहा वर्षे वयापर्यंतच्या बालकांच्या आरोग्यासाठी या विभागामार्फत योजना राबविल्या जातात. पोषण आहार, औषधोपचार, नियमित तपासणी याशिवाय आर्थिक मदतीच्या योजना आहेत. यानंतरही बालमृत्यू थांबले नाही.

गर्भवतींकडे होतेय दुर्लक्षप्रशासनातील यंत्रणेकडून गर्भवती माता ते बालकांपर्यंत योजनेचा लाभ पोहचत नाही, अशी ओरड आहे. गर्भवतीची योग्य आरोग्य तपासणी होत नाही, प्रसूतीनंतर बाळाची योग्य काळजी घेण्यात येत नाही. परिणामी त्यांना गंभीर आजार होतात. शिवाय योग्य आहार मिळत नाही. यातूनच बालकाचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जाते.

‘आरोग्य’च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हनवसंजीवनी योजने अंतर्गत येणाºया १७ जिल्ह्यांमध्ये २०१८-१९ या वर्षात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील २१०६ बालकांचा मृत्यू झाला. आदिवासीबहुल हे जिल्हे आहेत. अतिसंवेदनशील जिल्हे असल्याने त्याठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने अधिक योजना हाती घेण्यात आल्या आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातही १४ बालमृत्यूची नोंद झाली आहे. मात्र याविषयी सरकार गंभीर नसल्याचा आरोप आरोग्य क्षेत्रात कार्य करत असलेल्या लोकांकडून केला जात आहे.२०१८-१९ मधील बालमृत्यूनाशिक जिल्हा ४५१, नंदूरबार ४२६, अमरावती ४०९, पालघर १९९, चंद्रपूर १०१, धुळे ९८, यवतमाळ ७७, ठाणे ६६, गडचिरोली ६२, अहमदनगर ५३, गोंदिया ४६, नांदेड ३९, पुणे ३१, रायगड १८, जळगाव १६ व नागपूर १४. गर्भवती माता आणि बालकांसाठी योजना राबवित असलेल्या आरोग्यसह इतर विभागात समन्वय नाही. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे सांगितले जाते.बालमृत्यू रोखण्यासाठी गर्भवती मातेची नियमित तपासणी गरजेची आहे. प्रसूतीनंतर बाळाचे वजन, उंची, आहार आदी बाबी सातत्याने तपासण्याची गरज आहे. ही सर्व जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. शिवाय पालकांनीही जागरूक असावे.- डॉ. अभिजित मोरे, सहसमन्वयक, जनआरोग्य अभियान

टॅग्स :Deathमृत्यू