शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

१९८ ग्रामपंचायतींच्या नळ योजनेची वीज तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:39 PM

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देगावांमध्ये हाहाकार : ४५३ ग्रामपंचायती वितरणच्या रडारवर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना थकीत वीज बिलापोटी जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतीच्या नळ योजनांचा वीज पुरवठा तोडण्यात आला. वीज वितरण कंपनीच्या या कारवाईने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे गावागावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल थकीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे बिल थकीत आहे. सध्या सत्तारुढ असलेल्या सरपंचावर या बिलाचा भार येऊन पडला आहे. आधीच ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत बिल कसे भरावे, असा प्रश्न आहे. दुसरीकडे अपुऱ्या पावसाने पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. याबाबत ग्रामपंचायतींनी वीज वितरण कंपनीला विनंती करून पाणीटंचाईच्या काळात वीज पुरवठा खंडित करू नका, असे म्हटले आहे. मात्र कंपनीने थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी थेट वीज पुरवठा तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल १९८ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. तर विरोधी गट याचा राजकीय फायदा घेत आहे. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.थकीत वीज बिलासाठी सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांपासून ते वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वांना विनंती केली आहे. मात्र वीज वितरण कंपनीने थकीत बिलाची ७५ टक्के रक्कम भरावीच लागेल, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ग्रामपंचायती हतबल झाल्या आहेत. १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरायचे म्हटले तर गटविकास अधिकारी त्याला विरोध करीत आहे. ग्रामपंचायतीजवळ वसुलीची रक्कमही अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या काही अधिकाºयांनी सरपंचांना वीज बिल भरण्यासाठी स्वत:च्या क्रेडीटवर कर्ज उभारण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सरपंच चांगलेच अडचणीत आले आहे. दुसरीकडे वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव पाणीटंचाईने होरपळत आहे. गावकरी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे.सरपंचांची वीज वितरणकडे धावथकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक गावातील सरपंच गुरुवारी यवतमाळ येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. तासभर सरपंच या कक्षात ठिय्या देऊन होते. यावेळी दारव्हा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच उपस्थित होते. त्यात चिकणीचे सरपंच नीलेश राऊत, चाणीचे सदस्य सुशील ठोकळ, बानायतचे सरपंच संदीप देवकते, कामठवाड्याचे सरपंच प्रतिनिधी उमेश उके यांचा समावेश होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत