लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोमवारी दिवसभरात १९ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६९ वर पोहोचला आहे. सध्या मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डात ३०५ व्यक्ती दाखल आहेत.रविवारी ५० पर्यंत असलेली पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सोमवारी ६९ झाली. रविवारी मध्यरात्रीनंतर पाच, सोमवारी सकाळी सहा आणि संध्याकाळी आठ असे १९ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल दिवसभरात प्राप्त झाले. हे सर्व रूग्ण आयसोलेशन वॉर्डात देखरेखीत आहेत. सोमवारी आणखी ३२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून एकंदर १०२ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.पहिल्यांदा शहरातील प्रतिबंधित असलेल्या प्रभाग १० व २० या क्षेत्राबाहेरील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. याच भागात राहणारी महिला काही दिवसापूर्वी डोर्लीपुरा येथे वास्तव्याला आली. स्थानिक नागरिकांच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्या महिलेला दोन दिवसापूर्वी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तेथे तिचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला आयसोलेशन वार्डात ठेवले आहे. या महिलेने डोर्लीपुरा परिसरातील काही घरी भांडी घासणे व धुणे धुण्याचे काम केल्याचे सांगितले. त्यावरुन संबंधित कुटुंबांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सोमवारी सायंकाळी हाती घेतली होती. पोलीस मुख्यालयातील मेसमधील स्वयंपाकीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट होताच मेसमधील काही कर्मचाऱ्यांना व मेसमध्ये संपर्कात येणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. या सर्वांना क्वारंटाईन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.खरेदीसाठी दोन दिवस केवळ तीन तासचार दिवसांच्या यवतमाळ शहर कडकडीत बंदनंतर उद्या मंगळवार व बुधवारी दुपारी १२ ते ३ या वेळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा दिली जाणार आहे. पेट्रोल पंप, बँका, किराणा दुकाने, भाजीपाला, दुध, फळे ही दुकाने या वेळात सुरु राहतील. दवाखाने, पशु वैद्यकीय दवाखाने व औषधी दुकाने २४ तास नेहमीप्रमाणे सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ठोक भाजी मंडी मात्र बंदच राहणार आहे. घरोघरी भाजीचे हातठेले फिरविणाºयांना मात्र मुभा राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. काही तासांची मुभा नंतर आणखी कडकडीत बंद असा पॅटर्न पुढे काही दिवस सुरू ठेवावा लागणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले.सर्वाधिक ११२१ नमुने यवतमाळचे, ९८८ निगेटिव्हकोरोनाबाधितांची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. कोरोना तपासणीसाठी सर्वाधिक ११२१ नमुने यवतमाळातून नागपूरच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत यातील ९८८ अहवाल निगेटिव्ह आले.आणखी आठ वसाहती सीलकोरोनाचा उद्रेकामुळे सील केलेल्या भोसा रोडचा विस्तार गोधनी रोडपर्यंत आला आहे. सोमवारी आणखी आठ रहिवासी वस्त्या सील करण्यात आल्या. त्यामध्ये तारपुरा, चापमनवाडी, शिंदेनगर, आठवडीबाजार, विदर्भ हाऊसिंग, अलकबीर नगर, शुभंकर रोड, सुदर्शननगरचा समावेश आहे.
दिवसभरात १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST
पहिल्यांदा शहरातील प्रतिबंधित असलेल्या प्रभाग १० व २० या क्षेत्राबाहेरील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. याच भागात राहणारी महिला काही दिवसापूर्वी डोर्लीपुरा येथे वास्तव्याला आली. स्थानिक नागरिकांच्या सजगतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्या महिलेला दोन दिवसापूर्वी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तेथे तिचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले.
दिवसभरात १९ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
ठळक मुद्देअॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६९ : एकूण आकडा ८१