शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१८ गावांचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:18 IST

पाऊस कमी झाल्याने कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपाचा आधार तुटला असतानाच पाणी पुरवठा योजनेचीही वीज कापण्यात आली. परिणामी मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील पाणी बंद झाले आहे.

ठळक मुद्देथकीत बिलासाठी वीज पुरवठा तोडला : मालखेड उपकेंद्राची धडक कारवाई

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : पाऊस कमी झाल्याने कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपाचा आधार तुटला असतानाच पाणी पुरवठा योजनेचीही वीज कापण्यात आली. परिणामी मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील पाणी बंद झाले आहे. भर हिवाळ्यात नागरिकांना दिवस-रात्र पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनेचे थकीत बिल भरले नसल्याने वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.उत्तरवाढोणा परिसरातील सोनखास, हेटी, सोनवाढोणा, घुई, मालखेड आदी गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाची पातळी कमालीची खोल गेली आहे. याशिवाय इतर गावांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. अशातच पाणीपुरवठा योजनेची वीज कापण्यात आली. १८ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील ग्रामपंचायतीच्या नळ योजनांकडे मोठी रक्कम थकीत झाली आहे. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतीने रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे अशा योजनांची वीज चार दिवसांपूर्वी कापण्यात आली. या गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. आता नागरिकांना गावशिवारात असलेल्या स्रोतांवरून पाणी आणावे लागत आहे. आतापासूनच सायकल, मोटरसायकल, गाडीबैलाद्वारे पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच या परिसरातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.सिंगनडोहचे पाणी सिंचनासाठीउत्तरवाढोणा परिसरात असलेल्या सिंगनडोह तलावातील पाणी सिंचनासाठी ओढले जात आहे. तलावाच्या आजूबाजूला असलेल्या शेतासाठी पाण्याचा उपसा केला जात आहे. याविषयी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचा वापर थांबविण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यानंतरही उपसा सुरूच आहे. भविष्यात निर्माण होणारा पाणीप्रश्न लक्षात घेता या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.