शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

६६ दिवसांत १८ लाख लसीकरणाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

आराेग्य विभागाच्या संथगतीने चाललेल्या जहाजाच्या शिडात हवा भरण्यासाठी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी नाेव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय आता जिल्हा परिषद, नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ऑक्टाेबर महिन्यातच लसीकरण पूर्ण करायचे आहे. सध्या लसीची उपलब्धता पाहून लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार आहेत.

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात काेराेना लसीकरण नाेव्हेंबर अखेरपर्यंत संपविण्याचा अल्टिमेटम जिल्हाधिकाऱ्यांनी आराेग्य यंत्रणेला दिला आहे. यासाठी शहरी भागात नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश आहेत. यामुळे काेराेना लसीकरणासाठी केवळ ६६ दिवस हातात असून १८ लाख ४ हजार १४० नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान उभे ठाकले आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर या सात महिन्यांत केवळ तीन लाख ३३ हजार ४७२ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अनेक अडचणींना पार करत हा टप्पा गाठता आला आहे. काेराेना महामारीतून सुटका मिळवायची असेल तर लसीकरणच एकमेव पर्याय मानला जात आहे. जिल्ह्यात १८ वर्षांवरील  २१ लाख ३७ हजार ६१२  नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यापैकी ९ लाख ३३ हजार १५१ नागरिकांना पहिला डाेस देण्यात आला असून याची टक्केवारी ४३.६५ इतकी आहे. तर दुसरा डाेस हा ३ लाख ३३ हजार ४७२ नागरिकांना दिला असून त्याची टक्केवारी १५.६० इतकी आहे.  पहिला व दुसरा डाेस मिळून १२ लाख ६६ हजार ६२३ नागरिकांनी घेतला आहे. अजून पूर्ण लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी बरीच मजल आराेग्य यंत्रणेला मारायची आहे. आराेग्य विभागाच्या संथगतीने चाललेल्या जहाजाच्या शिडात हवा भरण्यासाठी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी नाेव्हेंबर अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. याशिवाय आता जिल्हा परिषद, नगरपरिषदेची यंत्रणा साेबत घेण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ऑक्टाेबर महिन्यातच लसीकरण पूर्ण करायचे आहे. सध्या लसीची उपलब्धता पाहून लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने अनेक जणांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्याची टाळाटाळ केली आहे. ९० दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही दुसरा डोस घेण्यास तयार नाही. याशिवाय पहिला डोस न घेणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात जनजागृती करण्याची नव्याने गरज निर्माण झाली आहे. तरच निर्धारित वेळेत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार आहे. 

लसीकरणाचे असे केले नियाेजन काेराेना लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आराेग्य विभागाने फेर नियाेजन केले आहे. आता पहिला फाेकस हा नगरपरिषद क्षेत्रात राहणार आहे. त्यासाठी मुख्याधिकारी, तालुका आराेग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना संयुक्तपणे नियाेजन करायचे आहे. नगरपरिषदेची यंत्रणाही लसीकरणाच्या कामाला लागणार आहे. शहरात आवश्यकतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविली जाणार आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आराेग्य केंद्राअंतर्गत किमान तीन गावांत लसीकरण केले जाणार आहे. लस उपलब्ध असल्यास ही संख्या वाढविता येणार आहे. या नियाेजनाच्या आधारावर संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या