शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

दारव्हा तालुक्याला हवी १८ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:48 IST

यावर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीपोटी शासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रूपये मदतची घोषणा केली.

ठळक मुद्देबोंडअळी नुकसान : शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत

मुकेश इंगोले ।ऑनलाईन लोकमतदारव्हा : यावर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीपोटी शासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रूपये मदतची घोषणा केली. त्यानुसार तालुक्याला १८ कोटी ४० लाख ८४ हजार ४३२ रूपयांची मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे.तालुक्यात खरिपात २१ हजार ४९८ शेतकºयांनी २८ हजार ६९ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. मात्र बोंडअळीने पात्या, बोंडे फस्त केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कपाशीच्या उत्पन्नात घट आल्यामुळे मदतीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शासनाने नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश दिले. सर्व्हेनंतर तालुक्यातील महसूल मंडळनिहाय विचार करता दारव्हा ६७९३ हेक्टर, लोही २६७६ हेक्टर, चिखली ३११२.४ हेक्टर, मांगकिन्ही ३४६९ हेक्टर, महागाव (क.) ५८०३ हेक्टर, बोरी ३२१३ हेक्टर व लाडखेड ३००३ हेक्टरचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. मदतीची अट लक्षात घेता ३३ टक्केपेक्षा कमी, अधिक नुकसानीचासुद्धा सर्व्हे करण्यात आला. मात्र सर्वच क्षेत्रावरील नुकसान ३३ टक्केपेक्षा अधिक आहे.दोन हेक्टरपर्यंत मदतीची शक्यता बघता तालुक्यातील १९ हजार ६८२ शेतकºयांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी, तर एक हजार ८१६ शेतकऱ्यांकडे जादा शेती आहे. याच पद्धतीने सर्वेक्षण करून अहवाल पाठविण्यात आला. त्यामुळे मदतीमध्ये नेमक्या कुठल्या अटी लावून निधी उपलब्ध करून दिला जातो, यावरच मदतीची रक्कम ठरणार आहे. तूर्तास झालेले नुकसान व जाहीर झालेली मदत बघता दारव्हा तालुक्याला १८ कोटी ४० लाख ८४ हजार ३४२ रुपये आवश्यक आहे.मदत कधी व कशी मिळणार?बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे करून अहवाल पाठविण्यात आला. मात्र मदतीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे ही मदत कधी आणि कशी मिळणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, लाडखेड महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावामधील कपाशीचे नुकसान ३३ टक्केपेक्षा कमी दर्शविल्यामुळे या संपूर्ण मंडळातील शेतकरी मदतीतून बाद होणार असल्याची चर्चा आहे. तथापि महसूल विभागाच्या सुधारित अहवालामध्ये या मंडळातील तीन हजार तीन हेक्टरवरील नुकसान ३३ टक्केपेक्षा जादा असल्याचे नमूद आहे. त्यामुळे मदत मिळेल, हे स्पष्ट आहे. तरीही लाडखेड मंडळातील शेतकºयांमध्ये मदतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :cottonकापूस