यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या जंबो पदभरती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. विविध २८ पदांसाठी शनिवारी परीक्षा घेण्यात आली. यावेळी पाच हजार ८४६ विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. तर १७३६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. रविवारी १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तीन तालुक्यात ही परीक्षा पार पडणार आहे.जिल्हा परिषदेने २८ पदांसाठी यवतमाळातील ३६ केंद्रांवर परीक्षा घेतली. यामध्ये वरिष्ठ साहाय्यक लिपिकाच्या ४ जागा, कनिष्ठ साहायक लिपिकाच्या १३ जागा, पशुधन पर्यवेक्षकाच्या २ जागा, कनिष्ठ साहायक लेखा परीक्षकाच्या २ जागा, विस्तार अधिकारी सांख्यिकी विभागाची १ जागा, कनिष्ठ अभियंत्याच्या ४ जागा, सिंचन अभियंत्याची १ जागा आणि पाणी पुरवठा विभागाची १ जागा याकरिता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात परीक्षेसाठी पाच हजार ८४६ विद्यार्थी परीक्षेला बसले. १७३६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. जिल्हा परिषदेची पदभरती जाहीर होताच जिल्ह्यातून हजारो उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. (शहर वार्ताहर)रविवारी परिचर पदाची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या परीक्षेसाठी १६ हजार विद्यार्थी बसणार आहेत. यवतमाळातील केंद्रावर इतक्या विद्यार्थ्यांना बसविता येणे अशक्य आहे. यामुळे यवतमाळातील ६० केंद्र, पुसदमधील ११ केंद्र आणि आर्णीमधील १३ केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.हॉटेल, धाबे, बसस्थानक हाऊसफुल्लशनिवारी आणि रविवारी विविध विषयांची परीक्षा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी यवतमाळात आले आहे. परीक्षेपूर्वी केंद्र मिळावे. कुठलाही गोंधळ घडू नये म्हणून शेकडो विद्यार्थ्यांनी यवतमाळ गाठले आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल, धाबे हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. बसस्थानकावर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. रविवारी १६ हजार विद्यार्थी यवतमाळात राहणार आहे. यामुळे गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
१७३६ उमेदवारांची दांडी
By admin | Updated: November 29, 2015 03:10 IST