शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील विजेची थकबाकी १६९६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 05:00 IST

लाॅकडाऊननंतरच्या काळात वीज वितरण कंपनीकडे वीज ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. अवास्तव बिल आल्याचा आरोप ग्राहकांकडून झाला. यावर मार्गदर्शन करणारे ऑनलाईन चर्चासत्रही झाले. यामुळे वसुलीची माेहीम वेग धरत असतानाच कृषीमंत्र्यांकडून शंभर युनिटच्या आतमधील ग्राहकांना सवलत देण्याची घोषणा झाली. दिवाळीपूर्वी यावर निर्णय होणार होता. प्रत्यक्षात या संदर्भात कुठलाही आदेश पुढे आला नाही.

ठळक मुद्देचोरी रोखण्यासाठी विशिष्ट केबल : थकबाकीदारांमध्ये सव्वा लाख शेतकरी

रूपेश उत्तरवार    लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने जिल्हाभरात चार लाख ९२ हजार ५१८ ग्राहकांना विजेचे कनेक्शन दिले आहे. यामध्ये कृषीपंपधारकांकडून वीज बिलाची वसुली झालीच नाही. यासह घरगुती ग्राहक आणि औद्योगिक ग्राहकांचीही मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी कायम आहे. यामुळे थकबाकीचा आकडा १६९६ कोटींच्या घरात पोहोचला आहे. लाॅकडाऊननंतरच्या काळात वीज वितरण कंपनीकडे वीज ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. अवास्तव बिल आल्याचा आरोप ग्राहकांकडून झाला. यावर मार्गदर्शन करणारे ऑनलाईन चर्चासत्रही झाले. यामुळे वसुलीची माेहीम वेग धरत असतानाच कृषीमंत्र्यांकडून शंभर युनिटच्या आतमधील ग्राहकांना सवलत देण्याची घोषणा झाली. दिवाळीपूर्वी यावर निर्णय होणार होता. प्रत्यक्षात या संदर्भात कुठलाही आदेश पुढे आला नाही. तर दुसरीकडे वीज कंपनीकडील थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. जिल्ह्यात वीज कंपनीकडे १६९६ कोटी ५१ लाखांची थकबाकी आहे.

१२६२ कोटी थकलेजिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांकडे २९ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. घरगुती ग्राहकांकडे १६ कोटी ८३ लाखांची थकबाकी आहे. तर कृषी पंपधारकांकडे १२६२ कोटी दोन लाखांची थकबाकी आहे. कृषीपंपधारकांकडे सर्वाधिक थकबाकी राहिली आहे. वसुलीसाठी वीज कंपनीला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. 

प्रत्येक गावांमध्ये घरोघरी वीज देण्याचा प्रयत्न  जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये वीज जोडणी करण्यासाठी वीज कंपनीमार्फत विविध योजना हाती घेण्यात आल्या. प्रत्येक घरांपर्यंत वीज देण्याचा प्रयत्न झाला. आता जिल्ह्यातील १८५३ गावांमध्ये वीज पोहोचली आहे. वीज कंपनीच्या माहितीनुसार जिल्ह्यातील कुठलेही गाव वीज जोडणीपासून शिल्लक राहिलेले नाही. प्रत्येकांना वीज मिळाली. वीज नाही असे एकही घर जिल्हाभरात नसल्याचा दावा वीज महावितरण कंपनीकडून केला जात आहे. 

कृषिपंपावर भारनियमनविजेचे वितरण करताना कृषीपंपांना तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस मध्यरात्रीनंतर वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जाहीर झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत कृषीपंपांवर सिंचनासाठी रात्रीला जागल करावी लागत आहे. याशिवाय सर्वाधिक भारनियमन कृषी फिडरवरच कायम आहे. त्यामुळेच दिवसा सिंचनासाठी वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

वीज चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. उद्यापासून शहरात वीज चोरांविरोधात मोहीम हाती घेतली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पाच वीज चोरांवर कारवाई करून तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माेहीम तीव्र करण्यात आली आहे.- संजय चितळे, कार्यकारी अभियंता, यवतमाळ.

टॅग्स :electricityवीज