लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेच्यावतीने दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व ग्लोबल रिच स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. मंगळवारी दुपारी झालेल्या या मेळाव्यात ७०० लाभार्थी उपस्थित होते.मेळाव्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगारासाठी उपस्थित असलेल्यांपैकी ४३४ उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यापैकी १६९ जणांना विविध कंपन्यांकडून नोकरीकरिता निवडण्यात आले. जिल्हाभरातून बेरोजगार मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नियोजन सभापती भानुदास राजने, शिक्षण सभापती नीता केळापुरे, सभापती नंदा जिरापुरे, उपसभापती सुजाता कांबळे, नगरसेवक जगदीश वाधवाणी, करुणा तेलंग, वैशाली सवाई, शुभांगी हातगावकर, पुष्पा राऊत, संगीता कासार, पुष्पा ब्राह्मणकर, वैशाली कनाके, कोमल ताजने, साधना काळे, प्रियंका भवरे, नीता इसाळकर, उद्धवराव साबळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भगत, मुख्याधिकारी अनिल अढागळे उपस्थित होते.मेळाव्याचे प्रास्ताविक अभियान व्यवस्थापक अनिल जिरापुरे यांनी केले. तर स्कील ट्रेनिंग प्रा.लि.चे राहुल टारे यांनी रोजगारविषयी माहिती दिली. संचालन डॉ. विजय अग्रवाल यांनी केले. मेळाव्याच्या आयोजनासाठी लीलाधर दहीकर, राजेश काळे, दीपक सिंगाणे यांनी सहकार्य केले.
रोजगार मेळाव्यात १६९ जणांना नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 21:55 IST
नगरपरिषदेच्यावतीने दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व ग्लोबल रिच स्कील ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. मंगळवारी दुपारी झालेल्या या मेळाव्यात ७०० लाभार्थी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यात १६९ जणांना नोकरी
ठळक मुद्देनगरपरिषदेचा उपक्रम : जिल्हाभरातील ७०० उमेदवारांचा सहभाग