शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

कोरोनाच्या धावपळीत १६ हजार विद्यार्थ्यांचा लागेना थांगपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

२०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे.

ठळक मुद्देनववी पास झाल्यानंतर दहावीचा परीक्षा अर्जच भरला नाही : शिक्षण विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षी कोरोनामुळे नववीतील सर्वच विद्यार्थी पास होऊन दहावीत पोहोचले. मात्र यातील तब्बल १६ हजार विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्जच भरला नाही. त्यामुळे हे १६ हजार विद्यार्थी नेमके गेले कुठे? शाळाबाह्य झाले की, बालवयातच रोजगाराकडे वळले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१९-२० या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यात ४४ हजार ४३२ विद्यार्थी नवव्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यात २० हजार ९४९ मुली तर २३ हजार ४८३ मुलांचा समावेश होता. कोरोनामुळे परीक्षा घेता न आल्याने या विद्यार्थ्यांना सरसकट दहावीत पाठविण्यात आले होते. तर अन्य विद्यार्थ्यांची संख्या मिळून दहावीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४५ हजार ५५६ विद्यार्थी नोंदविले गेले. यू-डायसमध्ये ही आकडेवारी नोंदविण्यात आली आहे. मात्र मार्च २०२१ च्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून केवळ २९ हजार १३६ विद्यार्थ्यांनीच  बोर्डाकडे अर्ज भरले. दहावीतील विद्यार्थी संख्या आणि परीक्षा अर्ज भरण्याची संख्या यात तब्बल १६ हजार ४२० इतकी तफावत आहे. हे १६ हजार विद्यार्थी नववीनंतरच शाळा सोडून गेले काय?, त्यांनी शिक्षण कायमचे सोडून दिले काय?, ते परजिल्ह्यात तर स्थलांतरित झाले नाही नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे अनेक पालकांच्या रोजगारांवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षणाला कायमचा रामराम ठोकल्याची भीतीही जिल्ह्यातील जाणकारांमधून  वर्तविली जात आहे. 

पटसंख्येचा घोळ कायम 

इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधेच शाळाबाह्य झाला तरी पटसंख्या दाखविण्यासाठी त्याला शाळाबाह्य म्हणून दाखविले जात नाही. २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीमध्ये ४४ हजार ४३२ विद्यार्थी पटावर होते. तर यंदा दहावीमध्ये ४५ हजार ५५६ विद्यार्थी दाखविण्यात आले. त्यामुळे अधिकचे विद्यार्थी कुठून आले हा प्रश्न आहे. यू-डायसमध्ये नोंदविलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्षात बोर्डाकडे परीक्षा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत आहे. 

बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर...- शाळेतून दुरावलेली मुले आता शाळाबाह्य होण्याचा धोका आहे. यावर्षी मोठी गळती झाली.- यापूर्वी जिल्ह्यात पटावर नोंद असलेल्या विद्यार्थ्यांपैकी क्वचित काही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत नव्हते. मात्र यंदा हे प्रमाण काही हजारांवर गेले आहे. - कोरोना काळात पालकांचेही दुर्लक्ष झाले, मुलेही रोजगाराकडे वळली. याशिवाय बालविवाहांचे वाढलेले प्रमाण कारणीभूत ठरले.  

ज्यांनी दहावीचा परीक्षा अर्ज यंदा भरला नाही, कदाचित त्यांनी यावर्षी कोरोनामुळे ड्राॅप घेऊन पुढील वर्षी परीक्षा देण्याचा विचार केला असेल. ज्यांनी फाॅर्म भरले नाही, त्यांचे काय करावे, याबाबत बोर्डाकडून काही गाईड लाईन मिळतात का याची माहिती घेऊ. - दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या