शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

१६० शेतकऱ्यांची आत्महत्या अपात्र

By admin | Updated: December 13, 2014 02:31 IST

जीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

विठ्ठल कांबळे घाटंजीजीवनाचा डाव हरल्याने गेली १४ वर्षात तालुक्यातील २६९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील १०६ कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली, तर १६० शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ. त्यामुळे होणारी सततची नापिकी. दारिद्र्य पाचवीला पुजलेले. शेतात केलेला लागवडीचा खर्च. हाती आलेले उत्पन्न आणि मिळणारा दर. यात प्रचंड तफावत. सिंचनाअभावी बारमाही पीक घेता येत नाही. शेतीला जोडधंदा नसल्याने हातात पैसा खेळत नाही. परिणामी वाट्याला आलेला कर्जबाजारीपणा. यातून आलेले नैराश्य. या नैराश्यापोटीच जीवनाचा डाव हरलो या भावनेपोटी त्यांनी केलेल्या आत्महत्या.२००९ मध्ये तर २४ पैकी केवळ दोन पात्र ठरल्या तर २२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. २०१० मध्ये २२ पैकी २१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत २९ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यापैकी १७ पात्र, नऊ अपात्र तर तीन चौकशीत आहेत. सर्वाधिक आत्महत्या सन २००७ व २००८ मध्ये प्रत्येकी ३० झाल्यात. २०१४ च्या ११ डिसेंबरपर्यंत हा आकडा २९ पर्यंत गेला. सन २०११ ते ११ डिसेंबर २०१४ पर्यंत एकूण ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात ४३ पात्र तर ५० अपात्र ठरल्या. तीन प्रकरणे चौकशीत आहेत. शेवटच्या तीन आत्महत्येविषयी तहसीलदार एम.एम. जोरवर चौकशी करत आहे. यानंतरच त्या पात्र की अपात्र हे ठरविले जाणार आहे. कोणी विष घेवून, गळफास लावून, जाळून घेत तर कोणी विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.