शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१६ गावांतील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:04 IST

पूस प्रकल्पात पाणी असूनही ते मिळत नसल्याने १६ गावांतील नागरिकांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले. नऊ हजार हेक्टर ओलिताची क्षमता असलेला लोअर पूस प्रकल्प नियोजनाच्या अभावामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : लोअर पूस प्रकल्प ठरला कुचकामी, महागाव तहसील कार्यालयासमोर नागरिकांचे उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पूस प्रकल्पात पाणी असूनही ते मिळत नसल्याने १६ गावांतील नागरिकांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले.नऊ हजार हेक्टर ओलिताची क्षमता असलेला लोअर पूस प्रकल्प नियोजनाच्या अभावामुळे आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरत आहे. पूस प्रकल्पातून पाणी मिळावे म्हणून १६ गावांतील नागरिक सतत संघर्ष करीत आहे. मात्र प्रकल्पाचे अधिकारी थातूरमातूर उत्तरे देऊन त्यांची बोळवण करीत आहे. उपाययोजना करण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुरूवारपासून येथील तहसीलसमोर ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. पोहंडूळ, इजनी, तिवरंग, धनोडा, खडका, लेवा, वाघनाथ, बारभाई, राउतवाडी, काऊरवाडी, हिवरा, दहिसावळी, चिखली, मलकापूर, भोसा येथील नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहे.लोअर पूसमधून कालव्यात पाणी सोडावे म्हणून सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर इनामदार, माणिक गोमासे, गजानन खापरकर, जावेद चव्हाण, जयवंता जाधव, डॉ. विजय रावते, रमेश राठोड, संजय सोळंके यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी ७ डिसेंबर रोजी उपोषण केले होते. त्यावेळी पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आठ दिवसांनी उपोषणाची सांगता झाली. मात्र अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. त्याचा निषेध म्हणून नागरिकांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.