शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

हवामानाच्या अचूक अंदाजासाठी १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 10:24 IST

हवामानाचा अचूक अंदाज घेता यावा आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता यावे यासाठी राज्यात १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३९१ केंद्रांची उभारणीइस्रोचे तंत्रज्ञान, जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हवामानाचा अचूक अंदाज घेता यावा आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळता यावे यासाठी राज्यात १५० कोटींचा हायड्रो प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. इस्त्रोच्या तंत्रज्ञानातून राज्यात ३९१ केंद्रांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेतले जाणार आहे.हवामानाचा अचूक अंदाज घेता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते आहे. दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना फटका बसतो. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आजही तेवढा गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे आता अचूक अंदाज वर्तविण्यासाठी हायड्रो प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत इस्त्रोचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. राज्यात ३९१ केंद्र उभारण्यात येणार असून अमरावती विभागत त्यातील ९२ केंद्रांचा समावेश आहे. यामुळे केंद्रालगतच्या परिसरातील पावसाचा अचूक अंदाज घेता येणे शक्य होणार आहे. आद्रर्ता, उष्मांक आणि पावसाची वाटचाल आदी माहिती यामुळे मिळणार आहे. नागपूर विभागातील २९९ केंद्रांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव या प्रोजेक्टमधून दिला आहे. बाष्पीभवनपात्र, थर्मामीटर, आधुनिक पर्जन्यमापक यंत्र ११९ केंद्रांवर बंद पडले आहेत. ते पूर्ववत केले जाणार आहेत.

१३ नद्यांवर जलगुणवत्ता प्रयोगशाळाविदर्भातील १३ नद्यांवर जलगुणवत्ता प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. पाण्याचे ५७ मापदंड तपासले जाणार आहेत. वैनगंगा, पेंच, कन्हान, बांडिया, इंद्रावती, वर्धा, पैनगंगा, तापी, प्राणहिता, पूस, वाण, चंद्रभागा आणि मन या नद्यांचा समावेश आहे. तर जलाशयांमध्ये प्रयोगशाळा साकारली जाणार आहे. त्यात काटेपूर्णा, चापडोह, अप्पर वर्धा, पेंच, गोसी खुर्द या प्रकल्पांचा समावेश आहे. या ठिकाणच्या जलाशयात व नदीपात्रात किती पाणी आहे, धोक्याची पातळी ओलांडली तर नाही ना, पाणी दूषित झाले का, कुठले घटक आहे याची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.इस्त्रोच्या तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे. त्याचप्रमाणे जलाशयातील पाणीपातळी कळण्यास मदत होईल. अचूक अंदाजामुळे होणारे नुकसान टाळता येईल.- अनंत गोरडे,कार्यकारी अभियंताजलविज्ञान प्रकल्प, अमरावती

टॅग्स :isroइस्रो