शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सिंचन विहिरींच्या याद्यांसाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम

By admin | Updated: March 2, 2016 02:52 IST

सिंचन विहिरींची कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात चालढकल सुरू आहे. तालुक्यातील ७२ पैकी ५१ ग्रामपंचायतींनीच या याद्या तयार केल्या.

घाटंजीत आढावा सभा : मनरेगातून सिंचनाची कामे घेण्याचे निर्देशघाटंजी : सिंचन विहिरींची कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात चालढकल सुरू आहे. तालुक्यातील ७२ पैकी ५१ ग्रामपंचायतींनीच या याद्या तयार केल्या. उर्वरित २१ ग्रामपंचायतींना याद्या पूर्ण करण्यासाठी १५ मार्चपर्यंत संधी देण्यात आली आहे. येथील पंचायत समितीत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आमदार राजू तोडसाम यांनी हे निर्देश दिले आहेत.या बैठकीत प्रामुख्याने रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. १ हजार ५०६ शेतकऱ्यांच्या अर्जांपैकी १ हजार ४९ सिंचन विहिरींचे काम सुरू झाले आहे. २३४ विहिरी पूर्ण झाल्याची माहिती पंचायत समितीच्या मनरेगा विभागाचे उघडे यांनी यावेळी दिली. १ मे २०१५ च्या शासन पत्रानुसार कायम प्रतीक्षा यादी तयार करण्याचे आदेश आहे. या विषयात ग्रामपंचायतींनी चालढकल केल्याबद्दल आमदार तोडसाम यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. यादी नसल्याने शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर मंजूर होत नाही. परिणामी त्यांचे नुकसान होते. याद्या तयार करण्यासोबतच प्रत्येक गावात दहा सिंचन विहिरी मंजूर कराव्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सन २०१२ मध्ये आलेल्या पुराने खचलेल्या विहिरी दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असल्याचे आमदार तोडसाम यांनी सांगितले. ५ मार्चपर्यंत सर्व खचलेल्या विहिरींचे प्रस्ताव सादर करून मंजुरात दिली जाईल, असे गटविकास अधिकारी मानकर यांनी यावेळी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नसलेल्या गावात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे मनरेगा अंतर्गत घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. प्रत्येक ग्रामपंचायतीने ढाळीचे बांध, सिमेंट नाला बंधारा, शेततळे ही कामे मनरेगातून घ्यावी, असे सांगितले. बैठकीला पंचायत समिती सभापती शैलेश इंगोले, उपसभापती रमेश धुर्वे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)