शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ परिसरात १५ कोटींच्या रेतीचे साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

रेतीच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात गुंतले आहेत. थेट सत्तेपर्र्यंत वाटे जात असल्याने कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेक रेती तस्कारांनी परंपरागत वाहने बदलवून आता ट्रान्सपोर्टवर चालणारे बारा, चौदा, सोळा चाकाच्या ट्रकचा वापर सुरू केला आहे. नदी घाटावर रेती उत्खनन केल्यानंतर रस्त्यावरच्या एखादा शेतात तिचा साठा केला जातो.

ठळक मुद्देतस्करीसाठी चक्क अत्यावश्यक सेवा पासचा वापर : रेती माफियांचा नवा फंडा, वाहने बदलविली

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळ्यात रेती घाटांचा लिलाव होणार आहे. परंतु माफियांनी त्यापूर्वीच घाट उपसून मोकळे केले आहे. यवतमाळ परिसरात सुमारे १५ कोटी रुपये किमतीच्या रेतींचे साठे करण्यात आले आहे. रेती माफियांनी तस्करीसाठी चक्क अत्यावश्यक सेवा पासचा वापर केला असून त्यासाठी मालवाहू वाहने वापरली जात आहेत. हे रेती साठे व तस्करी प्रशासन-खनिकर्म विभागासाठी आव्हान आहे. या रेती तस्करांना राजकीय अभय असल्याचेही बोलले जाते.रेतीच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात गुंतले आहेत. थेट सत्तेपर्र्यंत वाटे जात असल्याने कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. अनेक रेती तस्कारांनी परंपरागत वाहने बदलवून आता ट्रान्सपोर्टवर चालणारे बारा, चौदा, सोळा चाकाच्या ट्रकचा वापर सुरू केला आहे. नदी घाटावर रेती उत्खनन केल्यानंतर रस्त्यावरच्या एखादा शेतात तिचा साठा केला जातो. त्यानंतर ही रेती या ट्रकमध्ये भरून ते ट्रक ताडपत्रीने झाकण्यात येतो. यामुळे जीवनावश्यक वस्तूचीच वाहतूक होत आहे, असे भासविले जाते. अनेकांनी तर चक्क अशा ट्रकवर त्याच्या अधिकृत पासेसही लावल्या आहेत. शिवाय शहरात येणाऱ्या प्रत्येक पोलीस चौकी, तपासणी नाक्याचा महिन्याकाठी हिशोब होत असल्याने रेतीच्या ट्रकला कोणीच थांबवित नाही.या पास लावलेल्या ट्रकमधून चोरीची रेती थेट शहरातील विविध भागात साठविली जात आहे. मागील १५ दिवसांत किमान ५० हजार ब्रास रेतीचा साठा माफियांनी केला आहे. शासन पाऊस संपल्यानंतर घाटांचा लिलाव करणार आहे. त्यापूर्वीच माफीयांनी रेती घाट रिकामे केले आहेत. यातून शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडाला आहे. आज शासन आर्थिक तंगीत असताना त्याच्या हक्काच्या महसुलावर पाणी सोडले जात आहे. आता हा साठा ताब्यात घेऊन त्याचा लिलाव केल्यास महसुलाची भरपाई करण्याचे औदार्य दाखविण्यात येते का याकडे लक्ष लागले आहे.विभागीय आयुक्तांच्या निर्देशाची पायमल्लीमहाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून रेती माफियांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच निर्देशानुसार कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. प्रत्यक्ष मात्र आतापर्यंत एकाही रेती माफियावर फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. रेती माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी मकोकाअंतर्गत तडीपारीची कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र दुर्दैवाने कोणावरच कारवई न झाल्याने एक प्रकारे वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे.येथे आहे अवैध रेती साठाभोसा मार्गावरील गुलमोहर पार्कमध्ये एक हजार ५०० ब्रास रेतीचा साठा केला आहे. रेतीघाटावरून रात्री १२ चाकी व १४ चाकी ट्रकमधून रेती आणली जात आहे. गोधनी येथील गिट्टीखदान, भोसा येथील भारतनगर, शादाब बाग, कोहिनूर सोसायटी, प्रभातनगर, सारस्वत ले-आऊट, जिद्राननगर पांढरकवडा रोड, घाटंजी रोड, बायपास रिंग रोड, नागपूर रोडवर पोबारू ले-आऊट, डेहनकर ले-आऊट, याशिवाय धानोरा कोट्यावधी रुपयांच्या रेतीचा अवैध साठा केला आहे.

टॅग्स :sandवाळू