शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतच्या शेतीला एकरी दीड कोटीचा भाव; शेतीचे भाव भिडले गगनाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:23 IST

Yavatmal : ले-आऊट टाकण्यायोग्य जमिनींची संख्या कमी

संतोष कुंडकर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : 'वावर आहे तर पॉवर आहे' असं म्हणतात आणि ते खरंही आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी शेतीला फारसे मूल्य नव्हते. मात्र, आता शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातही शहराला लागून असलेल्या शेतीचे भाव प्रती एकरी करोड रुपयांच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांत वणी शहराच्या सभोवताल नागरी वसाहती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बिल्डर्सकडून शहरालगतची शेती खरेदी करून तेथे ले-आऊट टाकले जात आहेत. यवतमाळ रोड, मुकुटबन रोड, भालर रोड, नांदेपेरा रोड या मार्गावर अनेक नवीन ले-आऊट तयार झाले आहेत. अनेकजण गुंतवणूक करण्यासाठी शेती व प्लॉट खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे शहराच्या अवती-भोवती असलेल्या ले-आऊटमधील प्लॉटच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. शेतीचे भाव वाढल्याने प्लॉटच्या किमतीदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. कोरोना काळात शेतीचे भाव कमी झाले होते. मात्र, कोरोना काळ संपल्यानंतर शेतीच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

सर्वसामान्य काय म्हणतात...जमिनी कमी झाल्या आणि ले- आऊटची संख्या वाढली. ले-आऊटसाठी जमिनींची मागणी वाढल्याने जमिनींचे भावही वाढले. - खुशाल कवरासे

"ले-आऊटयोग्य जमिनी कमी आहेत. जेथे पाण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी गृहप्रकल्प उभारले जात आहेत."- पराग हनुमंते.

गृहप्रकल्प या परिसरात वाढले

  • गणेशपूर : वणी शहरालगच्या गणेशपूर या भागात गृहप्रकल्प वाढले आहेत. या भागात अनेक ले-आऊट आहेत.
  • वणी बायपास : वणी-यवतमाळ बायपासवरदेखील अनेक ले-आऊट असून, या ठिकाणी नागरी वसाहती उभ्या झाल्या.
  • मुर्धोनी मार्ग : वणी-मुधोंनी मार्गावरही नागरी वसाहती वाढल्या असून, या भागात अनेक गृहप्रकल्प उभे आहेत.

कोणत्या भागात एकरी काय दर?नांदेपेरा रोडला सव्वा कोटीचा दर वणी ते नांदेपेरा मार्गावर ले- आऊटयोग्य शेतीचे दर प्रतिएकर एक ते सव्वा कोटी सांगितले जात आहे.

मुकुटबन रोडला एक कोटीचा दर वणी ते मुकुटबन मार्गावर सध्या शेतीचे दर एक ते सव्वा कोटी रुपये प्रतिएकर सांगितले जात आहेत.

यवतमाळ रोडला दीड कोटीचा दर वणी-यवतमाळ या राज्य महामार्गावर शहरालगत अनेक ले-आऊट आहेत. येथे शेतीचा सव्वा ते दीड कोटी भाव आहे.

मुर्धोनी रोडला एक कोटीचा दर वणी ते मुधोंनी मार्गावरही शेतीचे दर वधारले आहेत. येथे एक कोटी रुपये प्रतिएकर दर सांगितला जात आहे

टॅग्स :Yavatmalयवतमाळ