शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जरा हटके! यवतमाळात १४ सर्प पिलांचा झाला आईविनाच जन्म!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:48 IST

सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही. मात्र येथील वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाची अंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत.

ठळक मुद्देवन्यजीव अभ्यासकांचा प्रयोग : सापाची सापडलेली अंडी कृत्रिमरीत्या उबविली

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही. मात्र येथील वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाची अंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत. या प्रयोगातून वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन रिसर्च संस्थेच्या अ‍ॅनिमल केअर टेकर आणि सर्पमित्रांनी १४ पिलांना जीवदान दिले.अ‍ॅनिमल रेस्क्यूअर सुमित आगलावे यांना शहरातील एका घरून कॉल आला. तिथे झाडांच्या कॅरिमध्ये सापाची १४ अंडी आढळली. ती त्यांनी अलगद मातीसह उचलून आणली. संस्थेचे अभ्यासक अंकित टेंभेकर यांनी कृत्रिमरित्या ह्युमिडिटी बॉक्स तयार केला. ३२ दिवस अंड्यांची जोपासना केल्यानंतर १४ पिलांचा जन्म झाला.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गावंडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक अमित शिंदे, वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन रिसर्च संस्थेचे स्वेतल लांडगे, कार्तिक लांडगे, साहील महाजन, अक्षय मोहनापुरे, विक्की कुटेमाटे, अजय वर्मा, पवन दळवी, शुभम वाघाडे, धीरज सयाम यांनी या पिलांना निसर्गाच्या सानिध्यात सोडले. अंडी कृत्रिमरीत्या उबविण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.

असा असतो नानेटी सापनानेटी हा साप बिनविषारी असून ८० ते ९० सेमी लांब असतो. शरीरावर मऊ खवले असतात. पाठ तपकिरी असून प्रत्येक खवल्याला निळसर काळ्या रंगाची कडा असते. डोक्यापासून शेपटापर्यंत काळा किंवा तपकिरी रूंद व लांब पट्टा असतो. पोटाकडील बाजू पिवळसर असते. डोके चपटे असून डोळे मोठे असतात. वरचा ओठ पिवळा असतो. मादी ५ ते २५ अंडी घालते. हा साप झाडावर वेगाने चढतो. साधारण १० ते २० मीटर उंचीवरून तो उडी मारतो.

टॅग्स :snakeसाप