शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना १४ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:15 IST

गत महिन्यात जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला.

ठळक मुद्देतातडीने वाटप : जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गत महिन्यात जिल्ह्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला १४ कोटी तीन लाख ३१ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे.गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासाठी हा निधी ६ मार्चला प्राप्त झाला. हा निधी लगेच तालुक्यांना वितरित करण्यात आला. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना या निधीचे वाटप तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.जिल्ह्यात १२ आणि १३ फेब्रुवारीला गारपिटीने ११ हजार ९0 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यात आठ हजार ३२९ हेक्टवरील पिकांचे ३३ ते ५0 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. दोन हजार ७६१ हेक्टरवरील पिकांचे ५0 टक्केच्यावर नुकसान झाले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल प्राप्त होताच तो शासनाकडे पाटविला. त्यानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून शासनाकडून १४ कोटी तीन लाख ३१ हजार रूपये प्राप्त झाले.या निधीचे तातडीने वाटप तातडीने करून तसा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.अशी आहे तालुकानिहाय मदतयवतमाळ तालुक्याला एक कोटी ८३ लाख १९ हजार, कळंब १५ लाख ९७ हजार ५००, राळेगाव १७ लाख तीन हजार ७००, बाभूळगाव एक कोटी ४३ लाख ८१ हजार ५५, मारेगाव ६६ लाख ४४ हजार २२०, तर केळापूर तालुक्यातील शेतकºयांना २३ लाख ३९ हजार ७७५ रूपये मिळणार आहे. घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना ६४ लाख ५१ हजार, आर्णी एक कोटी ३८ लाख पाच हजार, दारव्हा तीन कोटी ६९ लाख १८ हजार, नेर १२ लाख ८२ हजार, पुसद एक कोटी ९८ लाख ३४ हजार, उमरखेड एक कोटी तीन लाख १७ हजार आणि महागाव तालुक्यातील शेतकºयांना ७३ लाख ३५ हजार रूपयांची मदत मिळणार आहे.