शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

१४ तालुक्यात काँग्रेसचे उमेदवार निश्चित

By admin | Updated: January 26, 2017 00:59 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी १४ तालुक्यातील नावे निश्चित झाली आहे.

नेत्यांची मुंबईत बैठक : दोन तालुक्यात वाद कायम, २९ ला घोषणा, ३० ला एबी फॉर्म यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी १४ तालुक्यातील नावे निश्चित झाली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि प्रा. वसंत पुरके यांच्या मतदारसंघातील दोन तालुक्यात उमेदवारीचा वाद कायम आहे. दरम्यान या वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक झाली. जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे काँग्रेस जिल्हा परिषदेच्या सर्व ६१ जागा आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. या गट आणि गणांसाठी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले. मात्र या अर्जांवरील अंतिम निर्णय मुंबईत २७ जानेवारी रोजी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. २९ जानेवारी रोजी उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार असून ३० तारखेला एबी फॉर्म वितरित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. चर्चेच्या दोन फेऱ्या आटोपल्या तत्पूर्वी मंगळवारी व बुधवारी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीच्या दोन फेऱ्या मुंबईत पार पडल्या. या बैठकीला जिल्ह्याचे निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार विजयराव खडसे, जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील आदींची उपस्थिती होती. या बैठकीतील चर्चेअंती जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत दारव्हा, आर्णी, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी, बाभूळगाव, कळंब, पांढरकवडा, आणि यवतमाळ या १४ तालुक्यांमध्ये फारसा वाद नसल्याचे निष्पन्न झाले. एका जागेसाठी अनेक अर्ज असले तरी वाद नसल्याने तेथे सक्षम उमेदवाराचे मेरिटवर नाव निश्चित करणे सोपे आहे. घाटंजी-राळेगावात रस्सीखेच घाटंजी व राळेगाव या दोन तालुक्यांमध्ये उमेदवारी कुणाला याचा वाद कायम आहे. त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)