शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या बंदोबस्तासाठी १२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:27 IST

राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील तब्बल १५ जणांचे बळी घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलली आहे.

ठळक मुद्देअपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांची भेट : मध्यप्रदेशातून येणार चार हत्ती

अशोक पिंपरे ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील तब्बल १५ जणांचे बळी घेणाऱ्या वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने ठोस पावले उचलली आहे. त्यासाठी जंगलालगत विशिष्ट ठिकाणी कुंपन करण्यासाठी १२ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वाघाला बेशुद्ध करण्याकरिता मध्यप्रदेशातून चार हत्ती व इतर कर्मचारी पाचारण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाघ प्रभावीत क्षेत्रात हत्तीवरून शोध घेऊन वाघाला चारही बाजूने घेरून बेशुद्ध केले जाणार आहे. वाघाच्या भितीने राळेगाव, कळंब, पांढरकवडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले. मजुरांची मजुरी बंद झाली. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे वन विभागातर्फे प्रभावित क्षेत्रात उंच मचान उभारण्यात येणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेती करता यावी, यासाठी कुणी तरी मचानवर उभे राहून चारही बाजूने लक्ष ठेवणार आहे.सराटी, बोराटी, लोणी, बंदर, मोहदा, वेडशी, सावरखेडा, वरध, डोंगरखर्डा, किनवट, तेजनी, विहीरगाव या क्षेत्राला वाघ प्राभवीत क्षेत्र मानले गेले असून येथे वाघाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे जंगलात विशिष्ट भागात कुंपन उभारून गावकऱ्यांना संरक्षण देण्याकरिता १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही लिमये यांनी स्पष्ट केले. कुंपनाचे काम येत्या काही दिवसांत सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली. याबाबत मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेऊन सूचना देल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्य वनसंरक्षक पी.जे. राहुलकर, उपवन संरक्षक के. अर्भणा, सहाय्यक व्यवस्थापक वसंत सरपे उपस्थित होते. त्यांच्याकडे उपस्थितांनी वाघ पकडण्याची मागणी केली. जनतेतर्फे माजी मंत्री प्रा.वसंत पुरके, अशोक केवटे, अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे, अंकुश मुनेश्वर, नीलेश रोठे, जयप्रकाश रागीनवार आदींनी बाजू मांडलीअभयारण्याचा प्रस्ताव नाहीया परिसरात वाघाला पोषक वातावरण असल्यामुळे येथे भविष्यात अभायारण्य होईल म्हणून वनविभाग वाघाला पकडत नसून येथे अभयारण्य होणार असल्याची चर्चा होती. मात्र अभयारण्याचा प्रस्तावच नसून भविष्यातही अभयारण्या होणार नाही, अशी माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.संपर्क कार्यालय राळेगावातजंगलाचा बराच भाग राळेगाव तालुक्यात येतो. मात्र वन कार्यालय मारेगाव येथे असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संपर्क होण्यास वेळ लागतो. यामुळे आता वनविभागाचे उपकार्यालय राळेगावात सुरू करण्याचे निश्चित झाले. येथे दोन अधिकारी व काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. कार्यालयासाठी वास्तू उपलब्ध करून देण्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.सोळावा बळी न जाण्याची काळजी घ्याआत्तापर्यंत वाघाने १५ बळी घेतले आहे. आता १६ वा बळी जाणार नाही एवढी शासन व वनविभागाच्या कर्मचाºयांनी काळजी घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे सावरखेडा येथील लेतूजी जुनघरे व जयप्रकाश रागीनवार यांनी लिमये यांच्याकडे केली.

टॅग्स :Tigerवाघ